रक्तदाते हीच खरी देशाची संपत्ती
70736
रक्तदाते हीच देशाची खरी संपत्ती
दयानंद गवस ः सावंतवाडीत रक्तदान शिबिर, रक्तमित्र सन्मान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः राज्यात रक्त न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचे पाहिले आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रक्तदाते सामाजिक भान ठेवून कार्यरत आहेत. हे रक्तदातेच आपली खरी संपत्ती आहेत, असे प्रतिपादन ऑनकॉल रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी केले. सावंतवाडी येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर आणि रक्तदाता सन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या उक्तीप्रमाणे १४ जूनला जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून ऑनकॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने या भव्य रक्तदान शिबिराचे आणि रक्तदाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत यांच्या हस्ते आणि दयानंद गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
व्यासपीठावर ‘नॅब’ असोसिएशनचे अध्यक्ष अनंत उचगावकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, कोमसाप सावंतवाडी शाखाध्यक्ष दीपक पटेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, ‘ऑनकॉल’चे सचिव बाबली गवंडे आणि रक्तपेढी तंत्रज्ञ (एसएसपीएम) मनीष यादव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रक्तदान चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक रक्तमित्रांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यामध्ये पत्रकार सचिन रेडकर, नीलेश मोरजकर, प्रा. रूपेश पाटील, सुभाष परुळेकर, जतिन भिसे, अमोल टेमकर, लुमा जाधव, राजू तावडे आणि विनायक गावस यांचा सत्कार करण्यात आला. ‘ऑनकॉल’ संस्थेचे अमोल गोवेकर, सागर येराम, सखाराम नाईक, राहुल खरात, नीतेश सावंत, आर्यन मयेकर, गौरेश गवंडी, श्रेयस राऊळ, मंगेश माणगावकर, सिद्धार्थ पराडकर, श्रीया माणगावकर, महेश रेमुळकर, सुहास राऊळ, स्वप्नील जाधव, गुंडू साटेलकर, प्रसाद परब आणि पंढरी सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे १०८ वेळा रक्तदान करून शतकी विक्रम करणारे ‘नॅब’चे अध्यक्ष उचगावकर यांचा पत्रकार संघाकडून विशेष सत्कार करण्यात आला. हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदेच्या विद्यार्थिनींनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक भागवत यांनी रक्तदान आणि दात्यांचा गौरव सोहळा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. रोटरी कायम सामाजिक कार्यात सक्रिय राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लबचे राजू पनवेलकर, दिलीप म्हापसेकर, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, राजेश मोंडकर, पत्रकार संघाचे सचिव विजय राऊत, उपाध्यक्ष हर्षवर्धन धारणकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गावस, प्रा. रूपेश पाटील, दीपक गावकर, रूपेश हिराप, नीलेश मोरजकर, लुमा जाधव, जतिन भिसे, साबाजी परब, वासुदेव होडावडेकर, श्रेया निंबाळकर, प्रणाली गिम्हावणेकर, स्नेहल फडतरे, सिद्धी दिवेकर, प्राजक्ता चिंदरकर, नेहा मोरे, क्रिष्णाली पोल, वृक्षाली काळे, ईश्वरी राणे, शियाली थोरात, निकिता सोनटक्के, ज्ञानश्री पाटील, आरोही सावे, मनस्वी खामकर, सुनील कोरगावकर, रामा वाडकर आदी उपस्थित होते. महेश रेमुळकर यांनी प्रास्ताविक केले. विनायक गावस यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार कुडाळकर यांनी आभार मानले.
----
मान्यवरांची मनोगते
कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांनी रक्तदान कार्याला शुभेच्छा देत हे कौतुकास्पद असल्याचे म्हटले. नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी रक्तदान हा आपला आवडता विषय असून, हे कार्य पैशांनी उपलब्ध होत नसून त्यासाठी सामाजिक जाणीव लागते असे नमूद केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे सांगत, रोटरी आणि ऑनकॉल रक्तदाता संघटनेची साथ लाभल्याने भविष्यात असेच समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.