-पाऊस आणि आदिम बियाणी

-पाऊस आणि आदिम बियाणी

Published on

जपूया बीज वारसा ---------लोगो
(१० जून टुडे ३)

भारतातील सुमारे ५५-६० टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. अनेक भागांमध्ये सिंचनाची सोय नसल्यामुळे पावसाचे पाणीच शेतीसाठी एकमेव स्रोत आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान होणारा पाऊस खरीप पिकांसाठी अत्यंत आवश्यक असतो. चांगल्या पावसामुळे भरलेले जलसाठे रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देतात. म्हणूनच पाऊस हा भारतीय शेतीचा कणा मानला जातो.
- rat१६p९.jpg-
25N70898
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था

-------
पाऊस आणि आदिम बियाणी
भारतात पावसाळा हा महत्त्वाचा ऋतू आहे. विषुववृत्ताजवळ असल्याने उष्णकटिबंधात मोडणाऱ्या भारतासारख्या देशाला पावसाची तहान नेहमीच असते. पिण्याच्या पाण्यासाठी पाऊस हा एकमेव स्रोत आहे. त्याचप्रमाणे भारतातील ७५ टक्के शेती ही कोरडवाहू असल्याने पावसावरच अवलंबून आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये पावसाला विशेष स्थान आहे. वेदांमधील ऋचांपासून ते येरे पावसा....या बालगीतापर्यंत पाऊस सर्वत्र व्यापून राहिला आहे. पावसाच्या कविता, चित्रपटातील पाऊसगाणी, अनेक कथा-चित्रपटांमध्ये पाऊस हा एक महत्त्वाचे पात्र म्हणून जाणवत राहतो. आनंद, दु:ख, प्रेम अशा सर्वच भावनांचे मिश्रण पावसाच्या रूपात पाहायला मिळते. पहिला पाऊस आणि मातीचा सुगंध, पाऊस आणि शाळा, पाऊस आणि भाताची लावणी, पाऊस आणि प्रेयसी, पाऊस आणि भजी ही काही अविस्मरणीय नाती कायमची जडलेली आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात पावसाळा हा एक स्वतंत्र ऋतू आहे.
भारतात एका विशिष्ट कालावधीमध्येच पाऊस पडतो. असा हा पाऊस भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांवर परिणाम करत असतो. म्हणूनच पावसाला भारताचा अघोषित अर्थमंत्री म्हटले आहे. पाऊस घेऊन येतात ते नैऋत्य मोसमी वारे किंवा मॉन्सूनचे वारे. किंबहुना मॉन्सून हा पावसासाठी असलेला पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो. अरबी शब्द मौसम आणि पोर्तुगीज शब्द मसाओ यांना एकत्र करत मॉन्सून या शब्दाची निर्मिती झाली, असे मानतात. मॉन्सून हे थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाहणारे वारे आहेत. भारतात ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. अशा वेळी भारतीय उपखंडाचे भौगोलिक स्थान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वारे आणि वातावरण यांचा एकत्रित परिणाम मॉन्सूनच्या प्रभावाला कारणीभूत ठरतात. हे वारे मे ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये सक्रिय असतात. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात तर रात्री उष्णता कमी झाल्याने जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहातात. अरबी समुद्र आणि त्याचबरोबर बंगालचा उपसागर या दोन समुद्रांतील हवेच्या दाबाचा मॉन्सूनवर मुख्यत: परिणाम होत असतो. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून ढग जड होतात. या ढगांना थंड हवा मिळाली की, पाऊस पडतो. साधारणत: जूनच्या सुरुवातीला केरळमध्ये सुरू झालेला पाऊस जुलैपर्यंत सर्व देशभरात पसरतो. सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊन तो ऑक्टोबरपर्यंत संपतो; मात्र हे असे सर्रासपणे म्हणता येणार नाही. या वर्षीच मे महिन्यात वळीव म्हणून आलेला पाऊस चांगलाच ठाण मांडून बसला आणि आता जूनचा अर्धा महिना संपला तरी त्याचे पुनरागमन झालेले नाही. पावसाच्या अनियमितपणात हवामान बदल हे संकट अगदी स्पष्टपणे दिसून येते. हवेमध्ये वाढलेले उष्माग्राही वायू म्हणजेच कार्बनडाय ऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड आणि बाष्प यांच्यामुळे एकूणच पृथ्वीच्या तापमानात वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून भारतातील पावसाचे चक्र बाधित झाले आहे. त्यामुळे अनियमित पाऊस, पावसाच्या येण्यामधील वाढलेले अंतर, एकावेळी ढगफूटी झाल्यासारखा कोसळणारा पाऊस याचा फटका अर्थातच शेतीवर सर्वाधिक होतो. अवकाळी आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होते. अशा प्रकारच्या हवामानात कडवी झुंज घेऊन उत्पादन देऊ शकतात ती केवळ आदिम बियाणी! म्हणून येत्या शेतीच्या हंगामात आदिम बियाणी लावा आणि भरघोस उत्पन्न मिळवा.

(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com