

swt१६५.jpg
७०९४६
सावंतवाडीः राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पिनशिप स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंसोबत उपस्थित मान्यवर.
उपरकर शूटिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंचा ठसा
मुंबईतील राज्य चॅम्पियनशिपः परब यांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः मुंबई-वरळी येथे २८ वी कॅप्टन एस.जे. इझीकील मेमोरियल स्टेट शूटिंग चॅम्पिनशिप स्पर्धा घेण्यात आली. यात मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे येथून स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा १० मीटर एअर रायफल, पिस्तूल, २५ मीटर पिस्तूल तसेल ५० मीटर रायफल व पिस्तूल प्रकारात घेण्यात आल्या. सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणारे तुषार परब (वेंगुर्ले) यांनी ५० मीटर २२ रायफल प्रोन प्रकारात ६०० पैकी ५४३ गुण मिळवून कांस्यपदक पटकावले.
या कामगिरीच्या जोरावर त्यांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी मेन्स व मास्टर मेन्स गटातून निवड झाली आहे. त्याचप्रमाणे १० मीटर पीप साईट प्रकारात सब युथ गटात नीलराज सावंत (सावंतवाडी) याने ४०० पैकी ३८५ गुण, गौरव आजगावकर (वेंगुर्ले) याने ४०० पैकी ३८१, शिवम चव्हाण (सावंतवाडी) याने ४०० पैकी ३८०, विधान धुरी (वेंगुर्ले) याने ४०० पैकी ३६६, मुलींच्या गटात ईश्वरी आंबेरकर (कणकवली) हिने ४०० पैकी ३६६ गुण, हंसिका गावडे (सावंतवाडी) हिने ४०० पैकी ३४९ गुण मिळविले.
तसेच १० मीटर पिस्तूल प्रकारात खुल्या गटात स्वानंद सावंत (सावंतवाडी) याने ४०० पैकी ३४८ गुण, याच क्रीडा प्रकारात ज्युनिअर गटात पार्थ देसाई (बांदा) याने ४०० पैकी ३४२ गुण मिळविले. ५० मीटर २२ पीप साईट रायफल क्रीडा प्रकारात दत्तप्रसाद आजगावकर (वेंगुर्ले) यांनी ६०० पैकी ५३८ गुण मिळविले. या सर्व खेळाडूंची निवड पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.
हे सर्व खेळाडू सावंतवाडी व वेंगुर्ले येथील उपरकर शूटिंग अॅकॅडमी येथे प्रशिक्षक कांचन उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक श्री. उपरकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले, जिल्हा क्रीडा कार्यालय, ओरोस तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.