चिपळुणात मोफत आरोग्य शिबिर

चिपळुणात मोफत आरोग्य शिबिर

Published on

चिपळुणात मोफत
आरोग्य शिबिर
चिपळूण ः शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नाम फाउंडेशन आणि चिपळूण पालिकेतर्फे येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छतादूतांची तपासणी करण्यात आली. या वेळी नाम फाउंडेशनच्या संचालिका डॉ. स्मिता सिंग, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, शहर अभियंता दीपक निंबाळकर, सोहम पाटील, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, नाम फाउंडेशन प्रतिनिधी प्रसन्न येवलेकर, श्याम राठोड आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, टी. टी. इंजेक्शन इत्यादी सेवा देण्यात आली.

कोकरेतील शिवसैनिकांचा
राष्ट्रवादीत प्रवेश
चिपळूण ः कोकरे जिल्हा परिषद गटात मोरेवाडी येथील शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. कोकरे मोरेवाडी येथील बालकृष्ण मोरे, दिलीप मोरे, विलास मोरे, अशोक मोरे, शाखाप्रमुख प्रशांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे कोणतीही मागणी किंवा अपेक्षा न ठेवता शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, नागेश साळवी, नीलेश कदम, संजय कदम, नीलेश खापरे, संजय घडशी आदी मान्यवर उपस्थित होते.

rat१६p२८.jpg -
२५N७०९५०
चिपळूण ः पोफळी येथील प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षक आणि पालक.

पहिलीच्या वर्गात
विद्यार्थ्यांचा प्रवेश
चिपळूण ः उन्हाळी सुटीनंतर आज चिपळूण तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली. तालुक्यातील ३१३ शाळांमध्ये सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश केला. शाळेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आजपासून नवीन शैक्षणिक सत्रारंभ झाला. पहिलीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवामुळे शाळा परिसर किलबिलाटाने गजबजला. पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. दीड महिन्याच्या सुटीनंतर चिपळूण तालुक्यातील ३१३ प्राथमिक शाळा सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग व शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. चिपळूण तालुक्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या २४५ प्राथमिक शाळा आहेत. ६८ खासगी शाळा आहेत. आरटीईनुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकाच्या शंभर टक्के पट नोंदणीसाठी सर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रथम दिवशी प्रवेशोत्सव घेण्यात आला. नवागत बालकांचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com