-जिल्हा कबड्डी संघात निवड

-जिल्हा कबड्डी संघात निवड

Published on

rat१६p२५.jpg, rat१६p२६.jpg -
२५N७०९३८, P२५N७०९३९
वेदांत शिगवण , श्रेयस लाले
----
शिगवण, लाले यांची निवड
जिल्हा कबड्डी संघ; प्रशिक्षकपदी संतोष शिर्के
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ ः राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी १८ वर्षांखालील मुलांचा रत्नागिरी जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले व वेदांत शिगवण या दोघांची तर दापोली येथील नयन ठोंबरे या खेळाडूची निवड झाली आहे. तसेच जिल्ह्याचे प्रशिक्षक म्हणून संतोष शिर्के तर व्यवस्थापक म्हणून महेश शिंदे काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेला लाले, शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात १८ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता निवड झाली आहे. अमर भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन मिळते. चालू वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्याचे शिवधनुष्य अमर भारत क्रीडा मंडळ व न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे यांनी उचलले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर लाले, सुयोग लाले, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे यांच्या माध्यमातून लाल मातीतील खेळाडूंना घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com