

swt167.jpg
70948
श्री गणेश
झोळंबे येथे शुक्रवारी
गणेश वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ः सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली चालत असलेल्या झोळंबे येथील पांडुरंग मंदिरात शुक्रवारी (ता. २०) गणेश वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी भव्य उत्सव साजरा होणार आहे. दुपारी ३ वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे. सर्व भक्त मंडळींनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. ज्यांना भजन सेवा सादर करायची असेल तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.................
swt1610.jpg
70986
सावंतवाडी ः नरेंद्र डोंगर परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
किसान संघ, ‘अभिनव’तर्फे
नरेंद्र डोंगरावर वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील होणारा संघर्ष टाळायचा असेल तर प्राण्यांना जंगल भागातच त्यांचे खाद्य मिळायला हवे, असा विचार करून भारतीय किसान संघ व अभिनव फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने येथील नरेंद्र डोंगर येथे बीजारोपण व वृक्षारोपण अभियान राबविले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आंबा, फणस, कोकम, चिंच अशा फळझाडांच्या बिया जंगलात रोवल्या. सावंतवाडी नगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानातून उपलब्ध करून दिलेली तिरफळ, आवळा, वड, चिंच या झाडांची लावगड केली. तसेच सिडबॉल विखुरण्यात आले. यावेळी वन विभागाचे आरएफओ सौरभ पाटील उपस्थित होते. या अभियानात राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषदेच्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले सहभागी झाली. दरवर्षी असा कार्यक्रम करायचा संकल्प घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.