

-rat१६p५०.jpg-
२५N७०९८३
रत्नागिरी : नाचणे शाळा क्र. १ मध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण करताना जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह.
-rat१६p५१.jpg-
२५N७०९८४
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सवावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करताना मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर.
-rat१६p५३.jpg ः
२५N७०९९१
शेनाळे : पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या श्रीजा सुर्वे विद्यार्थिनीला घरातून शाळेत वाजतगाजत आणताना मान्यवर, शिक्षक पालक व विद्यार्थी.
-rat१६p४७.jpg -
२५N७०९७५
राजापूर ः चित्ररथ, ग्रंथदिंडीमध्ये मुलांसमवेत सहभागी झालेले प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, सुनील पाटील, सुनील जायदे आदी.
उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचा श्रीगणेशा
घोडागाडी, फुगे, ढोलताशांचा गजर; शाळांमध्ये आनंदोत्सव, १० हजार नवोदितांचे प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : जिल्ह्यात राजापूर वगळता सर्व शाळांमध्ये पहिल्याच दिवशी फुले उधळत हसतखेळत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी घोडागाडीतून विद्यार्थ्यांना आणण्यात आले. ढोलताश्यांचा गजर, फुग्यांची सजावट आणि औक्षण करून मुलांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम झाला. दोन दिवस मुसळधार पाऊस होता; पण आज पावसाने विश्रांती घेतल्याने मुलांनी जल्लोष केला.
शाळांचा परिसर सजवण्यात आला होता. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभातफेरीने केले तसेच पहिल्या दिवशी मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या २ हजार ४०० आणि माध्यमिक शाळांतील सुमारे साडेतीनशे शाळांमध्ये स्वागतोत्सव कार्यक्रम आयोजित केला. यंदा १० हजार विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा केला.
---
कोट
मातृभाषा मराठी असल्याने त्याच माध्यमातून प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे. कारण, मातृभाषेतून शिक्षण मुलांना चांगल्या रितीने घडवते.
- नंदकुमार साळवी, अध्यक्ष, भारत शिक्षण मंडळ
-
चिपळुणात नवविद्यार्थ्यांचे स्वागत
उन्हाळी सुटीचा हंगाम संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळांना सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी पहिलीत दाखल झालेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले. पहिलीत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकही हजर झाले होते. तालुक्यातील जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये आनंदी वातावरणात नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने शाळेचे प्रवेशद्वार आणि वर्गामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. महिला शिक्षकांनी नवोदित विद्यार्थ्यांचे औक्षण केले. या वेळी फुलांच्या वर्षावामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी सांगून त्यांना शाळेची गोडी लावण्याचा प्रयत्न केला; मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
---
आगाशे विद्यामंदिर
भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. ढोलताशांच्या गजरात बालदोस्तांचे स्वागत, गुलाबपुष्प, चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत, फुग्यांनी सजवलेली शाळा, पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप अशा वातावरणात कार्यक्रम झाला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्यासमवेत संस्था पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाचणे शाळा
शासनाच्या १०० शाळांना भेटी देणे या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाचणे नं. १ या शाळेला भेट दिली. त्यांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील सुविधांबाबत आढावा घेतला. या वेळी नाचणे गावचे सरपंच भैय्या भोंगले, विभागीय वनाधिकारी रणजीत गायकवाड, शिक्षणविस्तार अधिकारी संदेश कडव, उपसरपंच निलेखा नाईक, कार्यक्रमाधिकारी रवींद्र कांबळे, शिक्षक उपस्थित होते. ----------------
पटवर्धन हायस्कूल
पटवर्धन हायस्कूलमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात आणि आनंदमय वातावरणात झाला. शाळेतील नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून पेढे भरवून आणि शालेय साहित्याचे वाटप करून स्वागत करण्यात आले. शाळा परिसर आकर्षकरीत्या सजवण्यात आला होता. फुलांच्या रांगोळ्या, स्वागतफलक आणि रंगीबेरंगी सजावटीने शाळा परिसर आनंदमय वातावरणाने नटलेला होता. भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष श्रीराम भावे, सदस्य प्रबंधक विनायक हातखंबकर, खजिनदार सीए नचिकेत जोशी व पदाधिकारी उपस्थित होते.
मंडणगड जिल्हापरिषद शाळा
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १४३ शाळा, २४ माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव घरातून शाळेपर्यंत चांगलाच रंगतदार झाला. सर्व शाळा हारतुरे, फुगे, फुले आदींनी सजवण्यात आल्या. प्रभातफेरीने वाजतगाजत पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या नवागत मुलांना शाळेमध्ये प्रवेशीत केले. तसेच मुलांना पुष्प देऊन प्रत्येक शाळेत स्वागत करण्यात आले. दुपारी भोजनामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. तालुक्यातून २०९ विद्यार्थी, १९१ विद्यार्थिनी अशा एकूण ४०० विद्यार्थी पहिलीमध्ये दाखल झाली.
पूर्णगड शाळा
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात झाला. ढोलताशांच्या गजरात नवागतांचे स्वागत करण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दानशूर व्यक्तींकडून प्राप्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच सुहासिनी धानबा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पोलिसपाटील, पालक उपस्थित होते.
तळवडे विद्यालय
तालुक्यातील तळवडे येथील पेडणेकर विद्यालयात नवागतांचे लेझिम नृत्यासह ढोलताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईच्या स्थानिक कमिटीचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, सदस्य चंद्रकांत आंबेकर, नीलम पाटोळे, शाळा समिती सदस्य विजय पाटोळे, तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई संस्थेचे सदस्य वैभव पाटोळे, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, तळवडेच्या सरपंच रोहिणी आंबेकर आदी उपस्थित होते.
राजापूर शहर
‘शाळेला चाललो आम्ही’ असे हसतखेळत सांगत तालुक्यातील अनेक मुलांनी शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाऊल टाकले. शिक्षक, पालकांनीही मुलांचे ढोलताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढत आणि पुष्पगुच्छ देऊन मुलांचे स्वागत केले. शहरातील गोखले कन्या शाळा आणि विश्वनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत काढलेली ग्रंथदिंडी आणि चित्ररथाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांकडून मुलांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शहरातील गोखले कन्याशाळा आणि विश्वनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली ग्रंथदिंडी, चित्ररथ यामध्ये प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, विस्तार अधिकारी सुनील पाटील, केंद्रप्रमुख सुनील जायदे, अॅड. महेश नकाशे, अमृत तांबडे यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
(पोटात घ्यावा)
-ratchl१६१.jpg -
२५N७१०४३
चिपळूण ः शाळेच्या पहिल्या दिवशी सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या खेर्डी सती-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ‘सकाळ’ माध्यम समुहाच्यावतीने ‘सकाळ’ एनआयईचा अंक देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी दै. सकाळचे साहाय्यक वितरण व्यवस्थापक पांडुरंग साळवी, प्राचार्य राजेंद्र वरेकर, माजी उपसभापती राजाभाऊ चाळके, सरपंच राजेंद्र चाळके, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य महेश चाळके, डॉ. अरविंद पोतदार, ग्रंथपाल जयंत पवार, कलाशिक्षक टी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.