

71066
बाजारपेठेतील अतिक्रमणे लवकरच हटवणार
कणकवली नगरपंचायत, पोलिसांतर्फे सर्वेक्षण; नोटिसा बजावणार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ ः शहर बाजारपेठेतील अतिक्रमणे लवकरच हटवली जाणार आहेत. त्याअनुषंगाने नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने आज बाजारपेठेतील अतिक्रमणाची संयुक्त पाहणी केली. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण केलेल्या व्यापारी, विक्रेत्यांना नगरपंचायतीकडून नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतर अतिक्रमणे न हटविल्यास अतिक्रमण हटाव कारवाई केली जाणार आहे.
कणकवली शहरात होणारी वाहतूक, कोंडी, अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री नीतेश राणे, व्यापारी संघटना आणि नगरपंचायत प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती. यात बाजारपेठेतील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करणे, एक दिशा मार्गाची अंमलबजावणी करणे, सम आणि विषम तारखांना वाहन पार्किंगची व्यवस्था आदी कार्यवाही करण्याचे निश्चित केले होते. त्याअनुषंगाने आज पोलिस प्रशासन, नगरपंचायत प्रशासन आणि व्यापारी संघटना प्रतिनिधींनी बाजारपेठेतील अतिक्रमण भागाची संयुक्त पाहणी केली.
शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते ढालकाठी पर्यंत बाजारपेठ दुतर्फा रस्त्याची हद्द आणि त्यावर असलेली अतिक्रमणे यांची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील, पोलिस निरीक्षक मारूती जगताप, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, नगरपंचायतीचे रवी म्हाडेश्वर, प्रशांत राणे, तुषार कांबळे, प्रवीण गायकवाड, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, राजेश राजाध्यक्ष, हेमंत गोवेकर, राजन पारकर, विलास कोरगावकर, ‘आम्ही कणकवलीकर’ संघटनेचे अशोक करंबेळकर यांच्यासह व्यापारी संघटनांचे अन्य प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.
---
पार्किंगबाबतही लवकरच धोरण
मुख्याधिकारी पाटील, पोलिस निरीक्षक जगताप यांनी व्यापारी, विक्रेत्यांना रस्त्यावर आलेली अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे आवाहन केले. दोन दिवसांत याबाबत व्यापाऱ्यांना नगरपंचातकडून नोटिसा बजावल्या जाणार आहेत. यात अतिक्रमणे न हटविल्यास अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे यावेळी संयुक्तपणे ठरविले. तसेच एक दिशा मार्ग, तसेच सम आणि विषम तारखांना वाहन पार्किंगबाबत लवकरच धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.