लोकशाही दिनाकडे फिरवली पाठ

लोकशाही दिनाकडे फिरवली पाठ
Published on

71104


देवगडमध्ये लोकशाही दिनाकडे पाठ

प्रश्‍न जै सेथे; प्रमुख अधिकाऱ्यांसह नागरिकांचीही अनुपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ ः येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय लोकशाही दिनाकडे काही प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांनी पाठ फिरविली. लोकशाही दिनात एकही समस्या नसल्याने निर्णयाविना दिन साजरा झाला. त्यामुळे जनतेचे सर्वच प्रश्‍न सुटले की काय? असे म्हणण्यास वाव आहे.

नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी तालुकास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन राबवावा, अशा सूचना सप्टेंबर २०१२ च्या शासन परिपत्रकान्वये दिल्या आहेत. या दिवशी सार्वजनिक सुटी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल. त्याप्रमाणे तालुकास्तरावर येथील तहसीलदार कार्यालयात आज लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. हा तिसरा लोकशाही दिन होता. हा लोकशाही दिन दर महिन्यात सकाळी १० वाजता तहसीलदार कार्यालयात होतो. लोकशाही दिनाकरिता तकार अर्ज करावयाचा असल्यास आवश्यक नमुन्यात १५ दिवस आधी दोन प्रतींत पाठविणे आवश्यक असते. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी लोकशाही दिनात अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल, अशी याची रचना आहे. एप्रिलपासून तालुकास्तरीय लोकशाही दिनास प्रारंभ झाला होता. या महिन्यातील हा तिसरा लोकशाही दिन होता; मात्र काही प्रमुख विभागांचे अधिकारी लोकशाही दिनाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणार हे विभाग आहेत. या विभागाशी नागरिकांचा अधूनमधून नेहमीच संबध येतो; मात्र या विभागाचे अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधीच लोकशाही दिनात उपस्थित राहत नसल्याचे दिसते. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन पातळीवर लोकशाही दिन महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, समस्या घेऊन कोणी नागरिकच फिरकत नसल्याचे दिसून येते. पहिल्या लोकशाही दिनात एक अर्ज आला होता. यावेळच्या लोकशाही दिनाकडे तर नागरिकांनी चक्क पाठच फिरविल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्या सुटल्या की नागरिकांना काही प्रश्‍नच राहिलेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
..........................
कोट
लोकशाही दिनात तालुक्यातील नागरिकांना समस्या मांडण्यास वाव आहे. यावेळी तालुकास्तरीय सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रामुख्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे. जरी लोकशाही दिनात नागरिक अनुपस्थितीत असले तरी यावेळी तालुकास्तरावरील अधिकार्‍यांमध्ये विचारमंथन होऊन प्रशासकीय पातळीवर जाणवणार्‍या समस्या मार्गी लागण्यासाठी चर्चा होऊ शकते. काही सार्वजनिक समस्यांची सोडवणूक होण्यासाठी एकत्रित चर्चा होणे फलदायी ठरू शकते; मात्र काही प्रमुख विभागाचे अधिकारी किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी उपस्थित राहत नाहीत.
- रमेश पवार, तहसीलदार, देवगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com