

71111
कणकवलीत मुसळधार पाऊस
आचरा, हळवल मार्ग काही काळ ठप्प
कणकवली, ता.१६ ः कणकवली शहर आणि तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हळवल-शिवडाव आणि कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच गड आणि जानवली नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सकाळी अकरानंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे जनजीवन पूवर्वत झाले. दरम्यान तालुक्यात दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला होता.
कणकवली शहर आणि तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रात्रभर मुसळधार सरी कोसळल्या. कणकवली आचरा मार्गावर पिसे कामते येथे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक नंतर बिडवाडीमार्गे वळविण्यात आली. कणकवली हळवल शिवडाव मार्गावरील भाकरवाडी येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प होती. सकाळी दहा नंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे हळूहळू पाणी ओसरले आणि सकाळी अकरा नंतर पाण्यामुळे बंद झालेल्या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
मुसळधार पाऊस आणि त्यात जोरदार वारे वाहत असल्याने वीज तारांवर झाडाच्या फांद्या तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने आज दिवसभर तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी साडे सहा वाजता महावितरणला तालुक्याचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. मुसळधार पावसामुळे शहरतील जानवली नदीपात्रालगत असलेला गणपती साणाही भागातही मोठ्या प्रमाणात पाणी आले होतेे. त्यामुळे येथील कातकरी वस्तीमधील रहिवाशांनी काही काळ अन्य भागात स्थलांतर केले होते. दरम्यान दुपारनंतर पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली त्यामुळे बाजारपेठा पुन्हा गजबजल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.