तालुक्यातील ५३ टक्के नागरीकांनी घेतले धान्य

तालुक्यातील ५३ टक्के नागरीकांनी घेतले धान्य

Published on

मंडणगडमध्ये ५३ टक्के धान्य वाटप
रास्त दुकानात पुरेसा साठा ; तीन महिन्याचे रेशन एकावेळी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः मॉन्सूनमधील संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जून ते ऑगस्ट या तीन महिन्याचे रेशन एकावेळी वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार तालुक्यात धान्य वितरण सुरू झाले असून, तालुक्यात ५३ टक्के लाभार्थींना वितरण झाल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
मॉन्सून सर्वत्र सक्रिय होत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे यांना पूर येतो. या परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना ३० जूनपूर्वी तीन महिन्याचे रेशन वितरित करण्यात येत आहे. तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य रेशन दुकानांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळेल, अशी माहिती पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी दिली. तालुक्यात अंत्योदय योजनेचे १५३४, प्राधान्य कुटुंब १०१९२, एपीएल ४५०५ व शुभ्र १५८ शिधापत्रिका धारक आहेत व धान्यवाटप ५३ टक्क्यापर्यंत झाले आहे. आपली गैरसोय टाळावी याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून कार्डधारकांनी रेशन दुकानात जाऊन थेट तीन महिन्यांचे धान्य उचल करणे गरजेचे असल्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना संभाव्य गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही.

सुविधांचा लाभ घ्यावा
तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी शासनाच्या विविध ऑनलाइन सेवेचा लाभ घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यशासनाने शिधापत्रिकेतील काही बदल करण्यासाठी mahafood.gov.in आणि rcms.gov.in या वेबसाइटवरून लॉगइनचा पर्याय उपलब्ध केलेला आहे. गहाळ झालेली शिधापत्रिका, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नव्याने नाव समाविष्ट करणे, पत्ता बदलणे, नावातील बदल आणि इतर कामे आता घरबसल्या करता येणार आहेत. या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com