५ जी नेटवर्क एक झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान

५ जी नेटवर्क एक झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान

Published on

टेक्नो..........लोगो
(११ जून टुडे ३)

मानवाने मोबाइल नेटवर्कच्या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. मोबाइल तंत्रज्ञानाची प्रथम पिढी म्हणजेच १ जी ची सुरुवात १९८० पासून झाली. त्यानंतर २ जी १९९० पासून, ३ जी २००० पासून, ४ जीची सुरुवात २०१० पासून झाली आणि २०२१ पासून ५ जी आले. ५ जी म्हणजे मोबाइलला नेटवर्कची पाचवी पिढी. वेगवान नेटवर्क, अखंडित व उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही ५ जी तंत्रज्ञान हे सेल्युलर सेवेतील नवे तंत्रज्ञान आहे.
25N71261
- प्रा. तेजस्विनी शिंगे, लवेल, चिपळूण

-----
‘५ जी’ नेटवर्क एक
झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान

* ५ जी तंत्रज्ञान म्हणजे काय?
ः ५ जी ची निर्मिती ही या जगातील प्रत्येकाला आभासाने जोडण्याच्या उद्देशाने केली आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक मशिन, वस्तू यांना एकमेकांशी इंटरनेटच्या साह्याने जोडण्यास ५ जी उपयोगी ठरत आहे. ५ जी मोबाइलला नेटवर्क वापरकर्त्यांना अनेक गिगाबाईट प्रतिसेकंद इंटरनेट स्पीड देण्याची क्षमता ठेवते. गिगाबाईट प्रतिसेकंद म्हणजे एका सेकंदात १ जी पेक्षा जास्त आकाराचा डाटा ट्रान्स्फर करण्याची क्षमता. ४ जी सोबत तुलना केली तर ५ जी चा वेग १०० पटींनी अधिक आहे. ५ जी ची विश्वसनीयतासुद्धा अधिक आहे. ५ जी चा विलंब वेळ मिली सेकंदाइतका आहे. ५ जी मोबाइलला नेटवर्क हे कमी जागेत जास्त मोबाइलला जोडते. हे तंत्रज्ञान आल्याने इंटरनेटच्या साह्याने करायची कामे वेगाने पूर्ण होतात. नेटवर्कच्या अनुपलब्धतेमुळे अधुरे असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्ग खुले झालेले आहेत.

* ५ जी तंत्रज्ञान कसे कार्य करते?
कोणतेही वायरलेस उपकरण एकमेकांशी जोडण्यासाठी एका विशिष्ट रेंजची वारंवारता वापरते. ५ जी तंत्रज्ञान सब ६ बँडची रेंज ६०० मेगाबाइट ते ६ गिगाबाईटपर्यंत असते. ५ जी उपकरणे यापेक्षा खूप जास्त म्हणजे २४ गिगाहर्टझ ते जास्तीत जास्त ८६ गिगाहर्टझ वारंवारता वापरतात. जेवढी जास्त वारंवारता तेवढा नेटवर्कचा स्पीड जास्त. ५ जीमध्ये खूप उच्च वारंवारता वापरतात; पण वारंवारतेच्या सिद्धांतानुसार, जास्त वारंवारता मिळवण्यासाठी मोबाइल फोन टॉवरमधील अंतर कमी करावे लागले. ५ जी नेटवर्कसाठी नवीन फोनटॉवर बनवण्यात आले आहेत. त्यांना स्मॉल सेल्स असे म्हणतात. हे आधीच्या टॉवरपेक्षा कमी उंचीचे आहेत व एकमेकांमधील अंतर कमी ठेवावे लागते त्यामुळे उच्च वारंवारता मिळवणे शक्य होत आहे. ५ जी मध्ये अजून एक नवीन तंत्रज्ञान जोडण्यात आले आहे. त्याला बीम फॉर्मिंग असे म्हणतात. त्यामध्ये लहान सेल्सच्या कव्हरेझ क्षेत्रामध्ये वारंवारता चालू राहते. जेव्हा कोणतेही उपकरण इंटरनेट सोबत जोडण्याचा प्रयत्न करते.

- ५ जी तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये ः
* उच्च गती ः डाटा हस्तांतरण वेग ४ जी पेक्षा १० ते १०० पटीने जास्त आहे. त्यामुळे ५ जी नेटवर्कवर वर्च्युअल रिअॅलिटी आणि क्लाऊड गेमिंगसारख्या गतिमान ॲप्सचा आनंद घेता येतो.
* कनेक्टिव्हिटी ः अनेक उपकरणांना एकावेळी जोडता येते आणि उच्च डाटा ट्रान्स्फर दर मिळतो.
* लो लेटेन्सी ः लेटेन्सी म्हणजे डाटा हस्तांतरणात लागणार वेळ ५ जी नेटवर्कची लेटेन्सी ४ जी पेक्षा खूपच कमी आहे, ज्यामुळे रिअल टाइम अॅप्ससाठी अधिक चांगले नेटवर्क उपलब्ध झाले आहे जसे की, ५ जी नेटवर्कवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये थोडाही विलंब जाणवणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com