शिडवणे येथे कृषिदुतांचे ग्रामपंचायतीतर्फे स्वागत

शिडवणे येथे कृषिदुतांचे ग्रामपंचायतीतर्फे स्वागत

Published on

71278

शिडवणे येथे कृषिदुतांचे
ग्रामपंचायतीतर्फे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ सांगुळवाडी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्न अंतर्गत शिडवणे गावात दाखल झाले आहेत. त्यांचे ग्रामपंचायतीकडून स्वागत करण्यात आले.
यामध्ये कृषिदूत निशांत माने, राहुल पळसकर, दिग्विजय जांभळकर, पृथ्वीराज नरके, तेजस येडगे, अभंग सलगर, दिग्विजय संकपाळ, रुतेश यादव, वेंकटेश्वर रेड्डी, अशरफ उस्मान यांचा समावेश आहे. ते शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे ग्रामीण जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, नैसर्गिक साधन संपत्ती, समाजातील सामाजिक स्थिती, पीक पद्धती आदी विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील होळकर, टी. बी. गायकवाड, विवेक कदम यांच्या सूचनेनुसार ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सरपंच रवींद्र शेट्ये, उपसरपंच दीपक पाटणकर, ग्रामविकास अधिकारी देवेंद्र नलवडे व ग्रामपंचायत लिपिक उमेश मेस्त्री, रोजगार साहाय्यक विराज शेट्ये, परशुराम गुंडये व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी कृषिदुतांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com