संगमेश्वर-पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवले पोलिसांनी

संगमेश्वर-पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवले पोलिसांनी

Published on

rat17p8.jpg
71211
संगमेश्वर ः पुराच्या पाण्यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना संगमेश्वर पोलिस.
---------
पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवले पोलिसांनी
संगमेश्वरात होतंय कौतुक; खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ ः जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषतः संगमेश्वर खाडीपट्ट्यात सोमवारी पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते, ज्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. संगमेश्वर पोलिसांनी देवदुतासारखी धाव घेऊन लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मुसळधार पाऊस आणि पुराच्या लोंढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. धामणी येथील सनराईज हॉटेलजवळील पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. या बचावकार्यात पोलिस निरीक्षक शंकर नागरगोजे, अंमलदार सचिन कामेरकर, विनय मनवल, सतीश कोलगे, गिरिजाप्पा लोखंडे आणि उत्तम साळवे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. मनुष्यहानी होऊ नये यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. केवळ बचावकार्यच नव्हे तर ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी लोकांना जनजागृती करण्याचे कामही पोलिसांनी केले. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासंदर्भात मार्गदर्शन करून संभाव्य धोका टाळण्यास मदत केली. संगमेश्वर पोलिसांच्या या समयसूचकता आणि धाडसी कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्यांनी आपल्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com