गुरांच्या लसीकरणाचे उमरोलीत प्रात्यक्षिक
गुरांच्या लसीकरणाचे
उमरोलीत प्रात्यक्षिक
सावर्डेः मांडकी-पालवण येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयातील कृषिदुतांनी उमरोली (ता. चिपळूण) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत गुरांना लसीकरण कसे करायचे, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शेतकऱ्याने विचारलेल्या शंकांचे समाधानही कृषिदुतांनी केले. लसीकरण करताना लस किती प्रमाणात द्यायची, याचे प्रात्यक्षिक दाखवले. महाविद्यालयाचे ज्ञानोबा घोडके यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य रूपाली आरमरे, अशोक आरमरे उपस्थित होते. आदित्य पाटील, सम्मेद कुंभोजे, सार्थक चंदोबा, प्रणव पाटील, अन्वय धोंडे, प्रथमेश पाटील, रोहन चव्हाण, राजवर्धन पाटील, गणेश जगताप, क्षितिज कुलकर्णी, प्रथमेश सनबे, तुषार जाधव या कृषिदुतांनी लसीकरण प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
-------
‘घरडा’त प्रवेशासाठी
मार्गदर्शन सेल
चिपळूण ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाची सुवर्णसंधी प्राप्त व्हावी व त्यांच्या पालकांना बारावी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी संबंधित सर्व शासकीय नियमांचे तसेच प्रवेशसंदर्भातील विविध टप्प्यांचे मार्गदर्शन व्हावे, या हेतून घरडा इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये मोफत मार्गदर्शन सेलची स्थापना केली आहे. इंजिनिअरिंगसाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या पाल्याच्या प्रवेशाची दिशा निश्चित करावी, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे. विद्यार्थी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. यासाठी प्रा. सतीश जाधव यांची पूर्णवेळ कौन्सिलर म्हणून महाविद्यालयामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. योग्य त्या मार्गदर्शनासाठी डॉ. जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्यातर्फे केले आहे.
----------------
वैजी येथे
कृषी संवाद
सावर्डे ः मांडकी येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाच्या शिवकृषी ग्रुपच्या कृषिदुतांनी वैजी (ता. चिपळूण) येथील दत्तमंदिरामध्ये कृषी संवाद मेळावा घेतला. मेळाव्यात शेतकऱ्यांनी शेतीसंबंधित विविध समस्या मांडल्या. भातपिकावर पडणाऱ्या किडीचे नियंत्रण कसे करावे, बाजारात अत्याधुनिक बीबियाणे कोणते आहेत, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन योजना कोणत्या आहेत, फळझाडांची लागवड केल्यानंतर त्याची खबरदारी कशा पद्धतीने घ्यावी आदी समस्या कृषिदुतांसमोर मांडल्या. कृषिदुतांनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. मेळाव्यात सरपंच संदीप जाबरे, पोलिस पाटील सतीश मोहिते, देवेंद्र शिंदे, संदीप जाधव, संतोष मोरे आदी उपस्थित होते. विनायक सावंत, संग्राम माने, साहिल जमदाडे, श्रेयस जमदाडे, प्रसाद पंडित, सुहास पाटील, ओंकार नांगरे, सत्यजीत नांगरे, स्वप्नील तोडकर, सुशांत पाटील, संकेत चटके, श्रीशैल्य अवताडे या कृषिदुतांनी सहभाग घेतला.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.