पवित्र ज्योतिर्लिंगाचे आगमन भाग्याचे

पवित्र ज्योतिर्लिंगाचे आगमन भाग्याचे

Published on

71502

पवित्र ज्योतिर्लिंगाचे आगमन भाग्याचे

दीपक केसरकर ः सावंतवाडीत ‘सोरटी सोमनाथ’ दर्शन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः सावंतवाडी संस्थानचे कुलदैवत शंकर आहे. ही भूमीच शंकराची आहे‌. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले असे सोरटी सोमनाथ आहे‌. त्याकाळात अनेक हल्ले या मंदिरावर झाले. काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी त्याचे अवशेष जपले. एक हजार वर्षे हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित होते. या भूमीत ज्योतिर्लिंगाचे आगमन होणे भाग्याचे आहे, अशा भावना माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या.
सुमारे एक हजार वर्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ‘सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग’ रुद्रपुजा आमदार केसरकर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी पार पडली‌. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा झाली. यावेळी शेकडो शिवभक्तांनी केसरकर यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गर्दी केली होती.
वैदिक धर्म संस्थान व दी आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले. आमदार केसरकर यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगाची विधीवत पूजा झाली‌. यानंतर शेकडो शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. भक्तगण शिवभक्तीत तल्लीन झाले होते. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अशोक दळवी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी, दीपा सावंत, आनंद पोयेकर, बाळकृष्ण सावंत, अॅड. नीता कविटकर, किरण नाटेकर, अर्चना पांगम, दीपाली सावंत, शुभांगी सुकी, भारती मोरे, नितीन मांजरेकर, सुरेंद्र बांदेकर, सत्यवान बांदेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे, गोविंद प्रभू, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, शैलैश मेस्त्री आदी उपस्थित होते.
श्री. हाथी म्हणाले, ‘‘कोकण ही तपोभूमी आहे‌. कणकवली, सावंतवाडीत रुद्रपूजा झाली‌. भक्ती अन् श्रद्धा इथे नांदत आहे‌. आपली संस्कृती, परंपरा मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. याच दृष्टीने संपूर्ण कोकण दौरा करत आहोत. रत्नागिरी, रायगड, मुंबईनंतर संपूर्ण देशभरात ही यात्रा होईल. त्यानंतर ज्योतिर्लिंगाची विधीवत पुनर्स्थापना केली जाईल.’’
.................
अलौकिक ठेव्याला भव्य स्वरुप मिळावे
चुंबकीय शक्ती असणारे हे शिवलिंग अधांतरी राहत होते. अशी अलौकिक परंपरा भारताची होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठापना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी अध्यक्ष आहेत‌. या अलौकिक ठेव्याला ते भव्य स्वरुप प्राप्त करून देतील, यात शंका नाही. श्री श्री रविशंकर स्वामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यांचे भव्य स्वागत जिल्ह्यात केले जाईल, असे यावेळी आमदार केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com