न्हावेलीत शैक्षणिक साहित्याचे वाटप
71518
न्हावेलीत शैक्षणिक साहित्याचे वाटप
सावंतवाडी ः श्री देवी माऊली युवक कला, क्रीडा, सेवा मंडळ न्हावेली चौकेकरवाडी आणि मंडळाचे सल्लागार सदस्यांतर्फे न्हावेलीतील चारही प्राथमिक शाळांना तसेच चारही अंगणवाडींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. श्री देवी माऊली सेवा मंडळ सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. केवळ मनोरंजनच नव्हे, तर शैक्षणिक कार्यातही या मंडळांनी आपला ठसा उमटवला आहे. यातूनच यावर्षी त्यांनी गावातील चारही जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यामध्ये वह्या, पाणी बॉटल आदींचा समावेश आहे. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते हरिष धाऊसकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, लक्ष्मण परब, अंकुश मुळीक तसेच महिला, पालक, शिक्षक उपस्थित होते. मंडळाच्या या उपक्रमाबद्दल शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गातून कौतुक करण्यात आले.
....................
71519
‘पाट शिक्षण’च्या संचालकांचा सत्कार
म्हापण ः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाटच्या २०२५ ते २८ या कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारी संचालक मंडळातील सदस्यांचे प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थाध्यक्ष दिगंबर सामंत, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटकर, कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, कार्यवाह विजय ठाकूर, खजिनदार दीपक पाटकर, संचालक मंडळातील अवधूत रेगे, नारायण तळवडेकर, राजेश सामंत, सुधीर मळेकर, महेश ठाकूर, महाबळेश्वर कोचरेकर, हिशेब तपासनीस शरद कोनकर आदी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक हंजनकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रशालेचे पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी आभार मानले.
------
यशवंत गोसावींचा सत्कार
म्हापण ः कोचरे उत्कर्ष (डॉ. शिरोडकर) पतसंस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी रंजना हंजनकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत साळगावकर यांनी काम पाहिले. नुकतीच या पतपेढीची निवडणूक पार पडली. यात उत्कर्ष सहकार पॅनेल विजयी झाल्याने पुन्हा एकदा २५ वर्षे पॅनेलची सत्ता कायम राहिली. या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी संचालक देवदत्त साळगावकर, अर्जुन प्रभू, दत्ताराम राणे, अनंत पाटकर, कीर्ती गावडे, उपेंद्र रावले आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे संचालक मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले. माजी अध्यक्ष सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.