आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन

आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन

Published on

-rat१८p१.jpg-
P२५N७१४५३
बुद्धिबळपटू विहंग सावंत व कौस्तुभ हर्डीकर.
----
रत्नागिरीमधील दोन बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन
विहंग सावंत, कौस्तुभ हर्डीकर; विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : येथील बाल बुद्धिबळपटू विहंग सावंत व युवा खेळाडू कौस्तुभ हर्डीकर यांनी नुकत्याच झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांत चमकदार कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेचे जलद फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
तिसरीत शिकणाऱ्या विहंगने मडगाव (गोवा) येथे झालेल्या युनिटी क्लब तृतीय अखिल भारतीय जलद फिडे मानांकन स्पर्धेत तीन फिडे मानांकित खेळाडूंविरुद्धचे सामने जिंकत १४९८ एवढे जलद फिडे मानांकन प्राप्त केले. विनोद पावरा यांनी विहंगला बुद्धिबळाची तोंडओळख करून दिली. प्रतिस्पर्ध्याचे वय, रेटिंग इत्यादी गोष्टींचे दडपण न घेता विहंग आक्रमक चाली रचण्याच्या प्रयत्नात असतो. युवा बुद्धिबळपटू कौस्तुभ श्रीप्रकाश हर्डीकर याने पुणे येथे आयोजित एसव्हीआयएस प्रथम खुल्या जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत १४५७ इतके जलद फिडे मानांकन प्राप्त केले. कौस्तुभला बुद्धिबळ खेळाची विलक्षण आवड आहे. कॉलेजचा व्यस्त अभ्यासक्रम सांभाळून कौस्तुभ सतत बुद्धिबळाचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्नशील असतो. विहंग व कौस्तुभ रत्नागिरी येथील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीत बुद्धिबळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतात.
----
कोट
यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील इतरही अनेक खेळाडूंनी फिडे मानांकन मिळवले आहे. सध्याच्या काळातला विहंग सावंत हा जिल्ह्यातला सर्वात लहान वयाचा फिडे मानांकनप्राप्त खेळाडू आहे. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तो भाग घेतो. अशा पद्धतीने कमी वयातले शालेय विद्यार्थी आता बुद्धिबळ खेळाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात या खेळाला चांगले दिवस येतील.
- चैतन्य भिडे, प्रशिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com