-मंडणगडमध्ये 3 लाख वृक्षलागवडीचा प्रारंभ

-मंडणगडमध्ये 3 लाख वृक्षलागवडीचा प्रारंभ

Published on

मंडणगडात तीन लाख वृक्षलागवडीचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः महसूल विभाग मंडणगड व व्हीबीपी ग्रुप ऑफ कंपनीज्, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाकवली गावच्या हद्दीत ५१३ एकर क्षेत्रावर ३ लाख वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रारंभ झाला. हा उपक्रम व्हीबीपी ग्रुपच्या सीएसआर उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. पहिल्या दिवशीच १०७० झाडांची लागवड करण्यात आली.
पावसाळ्यातही ही मोहीम सुरू राहणार आहे. या वेळी सूर्यवंशी म्हणाले, व्हीबीपी ग्रुपच्या पर्यावरणपूरक कार्यासाठी महसूल विभागाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. या उपक्रमाची दखल राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल यासाठी प्रयत्नशील राहू. तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत महसूल विभागाच्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. या वेळी प्रांताधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे, वनविभाग अधिकारी तौफिक मुल्ला, वाकवली सरपंच गणेश पेंढारे, पोलिस पाटील मंगेश केंद्रे, शेनाळे पोलिस पाटील अमित बैकर, व्हीबीपी ग्रुप संस्थापक व चेअरमन विकास बेंगडे पाटील आदी उपस्थित होते.
---
कोट
२०२० पासून वृक्ष लागवडीसाठी पायाभूत तयारी करण्यात आली आहे. जमिनीची पूर्वमशागत, पाण्याचे व्यवस्थापन आणि कुंपणाचे काम पूर्ण झाले असून, यावर्षी अगरवूड, रक्तचंदन आणि महोगणी जातींच्या तीन लाख झाडांची लागवड करण्यात येणार आहे. फक्त लागवडच नव्हे तर झाडांचे संवर्धन आणि संगोपनही काटेकोरपणे होईल. हा प्रकल्प राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणचे नाव उज्ज्वल करेल.
- विकास बेंगडे पाटील, संस्थापक व अध्यक्ष, व्हीबीपी ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com