कानाचे आरोग्य कसे जपावे0

कानाचे आरोग्य कसे जपावे0

Published on

आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक---------लोगो
(१३ जून टुडे ४)

खरंतर, कानाचे आजार हे बहुतेकवेळा गंभीरपणे घेतले जात नाहीत. कारण, बऱ्याचवेळा कान दुखणे हे लक्षण नसते आणि आपल्या सर्वांच्या बाबतीत असे होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही आजारात दुखणे असले की, आपण लगेच डॉक्टरांकडे जातो किंवा आपले नातेवाईकदेखील आपल्याला घेऊन जातात; पण कानाच्याबाबतीत दुर्दैवाने असे होत नाही आणि येथेच आपली फसगत होते.

- rat१९p८.jpg -
25N71684
- डॉ. यशवंत देशमुख
---
कानाचे आरोग्य कसे जपावे?

सुरुवातीला आपण कानाची रचना कशी असते, हे समजावून घेऊयात. कारण, त्याशिवाय आपल्याला कानाचे आजार गंभीरपणे का घ्यावे, हे समजणार नाही. ढोबळमानाने कानाचे ३ भाग करता येतील. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंत्यकर्ण होय. बाह्यकर्ण व मध्यकर्ण या दोन्हींमध्ये कानाचा पडदा असतो. बाह्यकर्णच्या बाहेरील २/३ भाग हा त्वचेचा व ऊतीचा मिळून बनलेला असतो. त्यामुळे सामान्यतः त्वचा व ऊतीचे आजार बाहेरील कानालाही होऊ शकतात. बाह्यकर्णाचा १/३ अंतर्भाग हा हाडाचा व त्वचेचा असतो. याच भागात मळाचा खडा होऊन कान खूप दुखू लागतो किंवा ऐकू कमी होऊ शकते.
कानाचा पडदा हा अतिशय नाजूक असतो. विनाकारण कान साफ करताना पडद्याला ईजा होऊन छिद्र पडू शकते. तसेच पडद्याला जंतूसंसर्ग होऊन कान दुखू लागतो व कधीकधी तो वाहू लागतो. मध्यकर्ण हा अत्यंत संवेदनशील अवयव आहे व त्याची रचना ही अत्यंत गुंतागुंतीची असते. कानाचा हा भाग एका नलिकेद्वारे नाक व घशाशी जोडलेला असतो. त्यामुळे घशाचे किंवा नाकाला होणारे जंतूसंसर्ग लगेच कानाला होऊ शकते. यामुळेच कान-नाक-घसा ही वैद्यकीय शास्त्राची एक वेगळी शाखा झाली असावी!

मध्यकर्णाची रचना ः मध्यकर्ण हा एका बॅाक्ससारखा असतो, ज्याला ६ बाजू असतात व या ६च्या ६ बाजूला अतिशय महत्वाचे अवयव असतात.
समोरील बाजूला कोरोनरी रक्तवाहिनी असते, जी मेंदू व इतर अवयवांना रक्तपुरवठा करते तसेच दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे इस्टाशियन नलिका. ही नलिका कानाला नाक व घशाला जोडणारी नलिका आहे. आपण पुढे जाऊन या नलिकाचे काय महत्त्व आहे, हे समजून घेणार आहोत.
मध्यकर्णाची बाहेर कानाचा पडदा असतो व आतील बाजूला म्हणजे Medial side ला अंत्यकर्ण असतो, ज्यामध्ये शरीराचा तोल सांभाळणारे व ऐकू येण्यासाठी यंत्रणा असते. मागील बाजूस मस्टॉईड बोन असते आणि सिगमॅाईड सायनस असते जे मेंदू व डोक्याच्या भागातील रक्त हृदयाकडे घेऊन जाते. खालील बाजूस Floor जुगुलर व्हेन व कॅरोटिड आर्टरी असते. वरील बाजूला Roof याला टेगमेन वॅाल, असे म्हणतात आणि ही बाजू कान आणि मेंदूच्यामध्ये असते व खूपच नाजूक असते. मध्यकर्णाचा जंतूसंसर्ग वेळीच उपाययोजना केली नाही तर या भागातून लगेच मेंदूकडे जाऊ शकतो. अशावेळी पेशंट बऱ्याचदा बेशुद्ध पडतात व नातेवाईकांना त्याला नेमके काय करायचे, हे कळत नाही. त्यामुळे कानाचे उपचार करण्याऐवजी इतर उपचार केले जातात. म्हणजे ''आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी'' अशी गत होते.
कानाचे विकार गंभीरपणे घेतले जात नाहीत व त्यामुळे आपली फसगत होते, हे मी वर त्यासाठीच लिहिले आहे. आज आपल्या देशात डॅाक्टरकडे फक्त आजारी झाल्यावरच जायचे असते, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला आहे; परंतु आजार होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी, अशी मानसिकता फारशी दिसत नाही; मात्र वैद्यकीय तज्ज्ञ याबाबत माहिती देण्यास अतिशय तत्पर असतात.
आजार होऊच नयेत म्हणून डॅाक्टरांना भेटणे योग्य नाही का? आज आपण कानाचा असाच एक आजार जाणून घेऊ की, जिकडे वेळीच लक्ष दिले तर पुढील गंभीर आजार टाळता येऊ शकतात. हा आजार जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये दिसून येतो; पण कधी कधी हा आजार मोठ्या लोकांत पण दिसून येतो. या आजाराला सिक्रेटरी ओटिटिस मीडिया किंवा ग्लू इयर असेही म्हणतात.
हा आजार बहुतेकवेळा सर्दी किंवा घसादुखीनंतर होतो. आपण वर सांगितल्याप्रमाणे युस्टेशियन ट्यूबमधून इन्फेक्शन मध्यकर्णापर्यंत पोहचते व तेथे पाणी जमा होऊ लागते. त्यामुळे ऐकू खूप कमी होते. बरं, लहान मुले हे सांगू शकत नाहीत व आई-वडिलांनासुद्धा हे कळत नाही. त्यामुळे आई-वडील मुलांना रागावतात. याचाही विपरित परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे secretary otitis media या आजारामुळे कानाचे इतर आजार होऊ शकतात जसे की, Cholesteatoma जो अतिशय घातक असतो.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे Secretary otitis media हा पूर्णपणे बरा करता येऊ शकतो व वेळीच उपचार केले तर त्यापासून होणारे इतर दुष्परिणाम टाळता येतात. या आजारात ऐकू कमी येणे एवढेच लक्षण असते. कानाचे डॅाक्टर याचे निदान लगेच करू शकतात. त्यावर एक लहानशा शस्त्रक्रिया करून आतील कानातील पाणी काढून टाकले जाते व त्यानंतर परत पाणी जमू नये म्हणून एक नळी (Ventilation Tube) कामाच्या पडद्याला लावली जाते. १० मिनिटांच्या या शस्त्रक्रियाने कानाचे गंभीर आजार टाळता येतात. आजार टाळणे हे उपचार करण्यापेक्षा नक्कीच चांगले !

(लेखक हे कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com