जगबुडी नदीवरील ऐनवली-कुडोशी पूल धोकादायक
- rat१९p१७.jpg-
२५N७१७०२
खेड ः जगबुडी नदीवरील धोकादायक ऐनवली-कुडोशी पूल.
---
ऐनवली-कुडोशी पूल बनला धोकादायक
जगबुडी’भागातील ३० गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता ; ७० वर्षांपूर्वीचा पूल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ : तालुक्यातील ऐनवली-कुडोशी येथील जगबुडी नदीवर वसलेला सुमारे ७० वर्षे जुना पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून, या पुलाचा वापर करणाऱ्या जवळपास ३० गावांमधील हजारो नागरिक आता भितीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. १९५७ मध्ये सुमारे ३० मीटर लांबीचा हा पूल बांधण्यात आला होता.
दगडी बांधकामावर आधारित आणि अत्यंत अरूंद असलेला हा पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर या पुलावरून पाणी वाहून गेले आणि त्यानंतर या पुलाची अवस्था दिवसेंदिवस खालावू लागली. पुलाच्या पायालगतचे दगड मोठ्या प्रमाणात निसटले असून, पूल कमकुवत झाल्यामुळे तो कधीही कोसळू शकतो. पूल कोसळल्यास ऐनवली, कुडोशी, म्हाळुंगे, नांदीवली, हुंबरी, आंबवली, वरवली, चाटव, बिरमणी, कांदोशी यासह २५ ते ३० गावांचा संपर्क तुटेल. या परिसरात दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण आणि कामासाठी जाणारे नागरिक यांच्यासमोर मोठा पेच उभा राहील. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आता परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, नागरिक दररोज जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकीकडे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, दुसरीकडे संपूर्ण परिसराची दळणवळण व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे.
कोट
पुलावर मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. वाहने जाताना पूल हादरतो. भीती वाटते की, उद्या काही अनर्थ होईल. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.
- ऋषिकेश मोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.