-निसर्गात रमणारा साहित्यिक आमच्या कुटुंबात ही रमला

-निसर्गात रमणारा साहित्यिक आमच्या कुटुंबात ही रमला

Published on

-rat१९p९.jpg, rat१९p१०.jpg ः
P२५N७१७००, ५N७१६९३
चिपळूण ः गोवळकोट किल्ला येथील वृक्ष लागवडीची पाहणी करताना मारुती चितमपल्ली सोबत रामशेठ रेडीज, नीलेश बापट, चंदू भावे; दुसऱ्या छायाचित्रात रामशेठ रेडीज यांच्या वडिलांशी गप्पा मारताना मारुती चितमपल्ली.
--
निसर्गात रमणारा साहित्यिक आमच्या कुटुंबातही रमला
रामशेठ रेडीज यांनी जागवल्या आठवणी; वाशिष्ठीचे खोरे, जंगल पिंजून काढले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ : समुद्र नसलेल्या नागपूरचा माणूस म्हणजे मारुती चितमपल्ली कोकणात हर्णै (ता. दापोली) येथे येऊन माशांच्या प्रजातींवर अभ्यास करतो, याचे विशेष वाटल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो. घरी घेऊन आलो. पहिल्याच भेटीत आमची घट्ट मैत्री जमली असे नाही; पण कुठेतरी नाळ जुळल्याची खात्री मनोमन त्यांनाही पटली असावी. समान धागा जुळला तो जंगलाची ओढ आणि वाचन यांचा; मात्र हळूहळू मितभाषी चितमपल्ली आम्हा सर्वांचे काका आणि मुलांचे आजोबा कधी झाले ते कळलेच नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर कुटुंबातील माणूस हरपल्याची भावना मनात निर्माण झाली आहे, असे येथील पर्यावरणप्रेमी रामशेठ रेडीज यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
चितमपल्ली यांच्या आठवणी सांगताना रेडीज म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर चितमपल्लींनी कोकणात समुद्रकिनाऱ्यावर काळ घालवला. त्यांनी वाशिष्ठीचे खोरे आणि सह्याद्रीचे जंगल पिंजून काढले आहे. चिपळूणमध्ये आल्यानंतर ते माझ्या घरी थांबायचे. पहाटे साडेचार वाजता त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. औषध गोळ्या आणि इन्सुलिन स्वतः घ्यायचे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची ते काळजी घ्यायचे. अभ्यासकाने तर दिनचर्या आणि आहार हे कटाक्षाने सांभाळले पाहिजे, असे ते सांगत असत. चिपळूणला आले की, त्यांची पहिली ताकीद असायची. कुणालाही कळवू नका म्हणजे आपल्याला शांततेत राहून संशोधन आणि लेखन करता येईल. सकाळी आम्ही त्यांना धामणवणे येथील जंगलात डबा देऊन संशोधनासाठी सोडायचो. संध्याकाळी त्यांना परत आणायचो. ते गावातील लोकांशी बोलताना नोंदवहीत टिपणे, लिहिणे चालू असायचे. प्रत्येक नोंदीसह खातरजमा करणारा किंवा नवीन माहिती मिळवणारा प्रश्न ते विचारत आणि त्याच्या उत्तरादाखल मिळालेल्या माहितीची नोंद करायचे. त्यांची अशी एक नोंदवही सतत सोबत असायची. सलग १० ते १२ वर्ष ते आमच्या घरी येत होते. चिपळूणमध्ये आल्यानंतर त्यांनी सतत निरीक्षण, वाचन आणि लेखन याचाच व्यासंग केला. त्यांचे म्हणणे होते की, ज्यांना मला जाणून घ्यायचे आहे त्यांनी माझ्या पुस्तकांचे वाचन करावे. मला अजून बरेच वाचन, संशोधन आणि लेखन करावयाचे असून, काही मूलभूत कोश मराठीत तयार करावयाचे आहेत. त्यामुळे जो वेळ हाताशी आहे तो वाया न घालवता पुरेपूर वापरला पाहिजे. पुढच्या पिढीच्या हातात देण्यासारखे बरेच आहे. ते दिले नाही तर मलाच अपराध्यासारखे वाटेल. लोक नोकरीत असताना घरासाठी, आपल्या प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढत असतात. त्यांनी दरवेळी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढले ते पुस्तके घेण्यासाठी. हे समजल्यानंतर आम्ही त्यांना संशोधनासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक मदत केली.

तिवडीत अडवली होती वाघाने वाट
निसर्गप्रेमी योगेश भागवत यांनी सह्याद्रीतील वनबांधवांना एकत्र करून तिवडी गावामध्ये निसर्ग जपण्याचे काम केले. २००६ मध्ये त्यांच्या या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी ते तिवडी गावात आले होते, तेव्हा वाघाने त्यांची वाट अडवली जणू त्यांच्या स्वागतासाठी तो रस्त्यात उभा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com