सावर्डे-हडकणी रस्त्याची दुर्दशा

सावर्डे-हडकणी रस्त्याची दुर्दशा

Published on

-rat१९p५.jpg,
P२५N७१६८१
सावर्डे ः रस्त्यातील खड्ड्यातून जाताना वाहन व पादचाऱ्यांना काळजीपूर्वक जावे लागत आहे.
-rat१९p६.jpg-
२५N७१६८२
सिद्धिविनायक पार्कसमोर रस्त्याला आलेले तळ्याचे स्वरूप. (अशोक कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
---
सावर्डे-हडकणी रस्त्याची दुरवस्था
वाहनचालक, पादचाऱ्यांची गैरसोय; दुरुस्तीकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १९ : चिपळूण तालुक्यातील सावर्डे वालावलकर रुग्णालय ते हडकणीदरम्यानच्या तीन किमी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीकडे झालेले दुर्लक्ष, सतत पडणारा पाऊस, अवजड वाहनांची वाहतूक आदी कारणांनी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचला असून, मोऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. रस्त्याच्या बाजूपट्ट्या गायब झाल्या आहेत. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याचा वापर हडकणी, सावर्डे सुर्वेवाडी व आसपासच्या गावातील शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर करतात. हा रस्ता नांदगावला जोडल्यामुळे कुटरे व येगाव परिसर व सावर्डे बाजारपेठ यांच्यातील अंतर खूपच कमी झाले आहे. वालावलकर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, शैक्षणिक संस्था व सावर्डे बाजारपेठ आदी कारणांनी या मार्गावर वाहनांची व पादचाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्या मानाने सार्वजनिक बांधकामखात्याने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. सिद्धिविनायक पार्कसमोर रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्ता अरूंद असल्यामुळे वाहनांना बाजू देताना वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचले आहे. खड्ड्यांमध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनांची घसरण होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शालेय वाहनांना आणि आपत्कालीन सेवांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
ग्रामीण विकास पायाभूत निधीतून सार्वजनिक बांधकामखात्याने या रस्त्यावर ७७ लाख रुपये खर्च करून पुलाची बांधणी केली आहे. पुलावर योग्य सपाटीकरण नसल्याने त्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहते. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची हीच अवस्था होते. रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता आम्हाला कायमस्वरूपी दर्जेदार रस्त्याची गरज आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्यापही कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा मजबुतीकरणाचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com