विहीरीत पडलेल्या खवले मांजरास जीवदान

विहीरीत पडलेल्या खवले मांजरास जीवदान

Published on

swt१९१२.jpg
७१७४४
इन्सुलीः येथे जीवदान देण्यात आलेले खवले मांजर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. (छायाचित्र- निलेश मोरजकर)
swt१९१३.jpg
७१७४५
इन्सुलीः येथे पकडण्यात आलेले खवले मांजर.

विहीरीत पडलेल्या खवले मांजरास जीवदान
इन्सुलीत रेस्क्यूः वनविभागाच्या जलद कृती दलाचे सहकार्य
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ः इन्सुली खामदेव नाका येथील नीलेश सावंत-पटेकर यांच्या घरालगत असलेल्या विहिरीत पडलेल्या दुर्मिळ खवले मांजराला वनविभागाच्या जलद कृती दलाच्या सहकार्याने स्थानिकांनी जीवदान दिले.
श्री. सावंत यांचे मुंबई गोवा महामार्गलगत घर असून त्यांच्या घराच्या समोरच विहीर आहे. मुसळधार पावसाने विहीर तुडुंब भरली आहे. काल (ता. १८) सायंकाळी उशिरा घरातील सदस्यांना विहिरीत दुर्मिळ खवले मांजर पडल्याचे निदर्शनास आले. निलेश सावंत यांनी तात्काळ याची माहिती बांदा वन विभागाला दिली. सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, पत्रकार निलेश मोरजकर यांच्यासह बांदा वनरक्षक गजानन सकट यांनी घटनास्थळी धाव घेतली. निलेश सावंत यांनी दोरीच्या सहाय्याने खवले मांजराला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले. त्याची प्राथमिक तपासणी करून त्याला बांदा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागाच्या जलद कृती दलाचे बबन रेडकर, शुभम कळसुलकर, राकेश अमरुसकर, तांबोळी वनरक्षक सुयश पाटील, ओदक शास्ता, विठोबा बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते. खवले मांजराला रात्री उशिरा सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

चौकट
वनविभागाकडून आवाहन
आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचे प्रमाण अधिक असल्याचे वर्ल्डे वाईल्ड फंड (WWF) या संस्थेने निरीक्षण नोंदविले आहे. इंटरनेशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेनेही खवले मांजरास संकटग्रस्त यादीत वर्गीकृत केले आहे. या अतिशय दुर्मिळ, संकटग्रस्त अद्वितीय सस्तन प्राण्याच्या संरक्षणसाठी शासन विविध स्तरावर प्रयत्नशील असून त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे अनुसूची १ मध्ये वर्गीकृत केले असल्याने त्यास संरक्षण प्राप्त आहे. खवले मांजर शिकार, तस्करीकरिता ७ वर्ष इतक्या कारावासाची तसेच दंडाचीही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा अन्य ठिकाणी खवले मांजर आढळून आल्यास तत्काळ वनविभागासाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com