डीएपी उपलब्ध न झाल्यास पर्यायी खतांचा वापर करा

डीएपी उपलब्ध न झाल्यास पर्यायी खतांचा वापर करा

Published on

डीएपी उपलब्ध न झाल्यास
पर्यायी खतांचा वापर करा
दिशांत कोळप ः शेतकऱ्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पेरणी पूर्ण होत आली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. डीएपी खतामध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्ये आहेत. डीएपी खत उपलब्ध न झाल्यास त्याची कमतरता भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी इतर खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप यांनी केले आहे.
स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी हे खत देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद १६ टक्केसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आढळून येतात. तेलबिया पिकांसाठी या खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. याबरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६ व एनपीके १५:१५:१५ या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकासाठी पोषक ठरतो. टीएसपी खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खताचा वापर केल्यास तो देखील डीएपी खतास उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डीएपी खत उपलब्ध न झाल्यास डीएपी खताला पर्यायी खते वापरावीत, असे आवाहन कोळप यांनी केले आहे.

चौकट
खरीप हंगामासाठी उपलब्ध पुरवठा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२६ साठी मुबलक प्रमाणात भात बियाणी व ख़त उपलब्ध असून भात बियाणे मागणी ९३५१.८४ क्विंटल (सुधारित ८५२६.८४ क्विंटल) तर संकरित ८२५ क्विंटल पैकी आज अखेर ८२७८.५० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे, तर आज अखेर ५१६२.८० क्विंटल भात बियाणी विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यासाठी १९५५७ मेट्रिक टन खत मंजूर असून उपलब्ध खतापैकी ३२५८.८२ मेट्रिक टन ख़त साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिया १२५४.५३ मेट्रिक टन, डीएपी २.५५ मेट्रिक टन, एमओपी ८३.४५ मेट्रिक टन, एनपीके संयुक्त १२७८.०८ मेट्रिक टन, एसएसपी ६४०.१९ मेट्रिक टन खतांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com