पटवर्धन विद्यालयात साहित्याचे वाटप

पटवर्धन विद्यालयात साहित्याचे वाटप

Published on

पटवर्धन विद्यालयात
साहित्याचे वाटप
पावस ः कुर्धे येथील शिक्षण सुधारक समिती संचालित राधा पुरूषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या परिसरातील बहुसंख्य मुलांचे पालक शेतमजूर असल्यामुळे त्या सर्व मुलांना या संस्थेमार्फत गेली तीन ते चार वर्षे शैक्षणिक साहित्याचे वितरण करत आहेत. विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या देणगी रकमेतून विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, छत्री, कंपास, गणवेश आदी साहित्य विनामूल्य दिले जाते. यंदा कोथरूड (पुणे) येथील सार्थक वेलफेअर फाउंडेशन या संस्थेने शालेय साहित्याची १०० किटस्‌ देणगीदाखल उपलब्ध करून दिली. त्याशिवाय ८ वी ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. यथावकाश गणवेशही उपलब्ध करून दिले जातील. पहिली ते सातवीच्या मुलांनाही हे सर्व शैक्षणिक साहित्य लवकरच वितरित करण्यात येणार आहे.
-----
चिंचघर-बौद्धवाडीमध्ये
३० गुणवंतांचा सत्कार
खेड : तालुका बौद्ध समाजसेवा संघांतर्गत गट क्र. १ च्यावतीने तालुक्यातील चिंचघर-बौद्धवाडी येथील लुंबिनी‌ बुद्धविहारात खेड, चाकाळे, कोळकेवाडी, सुसेरी नं. १ व चिंचघरमधील दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण व पदव्युत्तर झालेल्या ३० गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सहजीवनच्या संचालिका सजेली बुटाला, तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष रवीउदय जाधव, माजी चिटणीस दीपक मोहिते, महिला तालुकाध्यक्षा स्वाती जाधव, चाकाळेचे उपसरपंच अक्षय गमरे, अजित मोहिते, उपाध्यक्ष भारत शिर्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गटाचे सरचिटणीस अमोल कांबळे, अनिल पवार, मानसी शिर्के यांनी केले.
----------
रंगकर्मी भाऊ कार्ले
यांचा सन्मान
चिपळूण ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा कै. राजाराम शिंदे पुरस्कृत नाट्य मंदार पुरस्कार येथील ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना प्रदान करण्यात आला. रंगभूमीव्यतिरिक्त इतर क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव व विधायक कार्याची दखल घेत सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विशेष गौरवाचे औचित्य साधून नाटक कंपनीतर्फे भाऊ कार्ले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नाटक कंपनीचे अध्यक्ष श्रवण चव्हाण, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, सदस्य मानस संसारे, प्रद्युम्न देवधर आदी उपस्थित होते. कार्ले यांनी चिपळूणच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीत अनेक दशके योगदान दिले असून, त्यांचे कार्य हे नव्या पिढीच्या रंगकर्मींना प्रेरणादायी ठरत आहे. नाटक कंपनी चिपळूणतर्फे त्यांचा सन्मान करून एक प्रेरणादायी कार्याचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com