मळगावला भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर तोडगा काढा
71944
जीर्ण विजेचे खांब, लोंबकाळणाऱ्या वाहिन्या जीवघेण्या
मळगाववासीयांची खंत; वीज समस्येवर तोडगा काढण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः तालुक्यातील मळगाव येथे गेले अनेक दिवस भेडसावणाऱ्या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी मळगाववासीयांनी महेश खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड आणि सचिव दीपक पटेकर हेदेखील उपस्थित होते. उपकार्यकारी अभियंत्यांनी दहा दिवसांत मळगाव येथील समस्या सोडवून अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
मळगाव येथे दिवसा वीज खंडित होण्यासोबतच अलीकडे दररोज रात्री आठच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच गावात अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीजपुरवठा, मोडकळीस आलेले खांब आणि कमी उंचीच्या खांबांमुळे लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे उद्योग-व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या भेटीदरम्यान, मळगाववासीयांनी नव्या उपकेंद्राची आवश्यकता आणि मळेवाड येथून येणारी वीजवाहिनी तातडीने जोडणी होणे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.
नऊ मीटरच्या लोखंडी खांबांची मागणी
सावंतवाडी शहराच्या शेजारील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मळगावातील व्यापारी, उद्योजक आणि घरगुती वीजग्राहकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बाजारपेठेतील दत्त मंदिर जवळील तसेच शिवाजी चौकातील खराब वीज खांब तातडीने बदलून नऊ मीटरचे लोखंडी खांब बसवण्याची मागणी केली.
--
अभियंत्यांकडून मागण्यांची दखल
उपकार्यकारी अभियंता राक्षे आणि साहाय्यक अभियंता खांडेकर यांच्याशी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर, मळेवाड येथून येणारी लाइन दहा दिवसांत पूर्ण करण्यासह बाजारपेठेत आणि इतर आवश्यक ठिकाणी नवीन लोखंडी खांब तत्काळ उभारून उर्वरित समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन राक्षे यांनी दिले.
----
...तर उपकेंद्रही मार्गी लावू
उपकेंद्र उभारणीबाबतच्या तांत्रिक बाबी दूर झाल्यास तेही लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी संजय तांडेल, प्रमोद राऊळ, सहदेव राऊळ, राजू निरवडेकर, राजन राऊळ आणि स्वप्नील ठाकूर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.