कोलगाव जंगलात सुरंगी, वडाची लागवड
72291
कोलगाव जंगलात सुरंगी, वडाची लागवड
‘स्टेपिंग स्टोन’चा उपक्रम; विद्यार्थ्यांकडून वन संवर्धनाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः पृथ्वीवरील सर्व सजीव या आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच पर्यावरणाच्या सहवासात राहतात. त्यामुळे सर्व सजीवांच्या हितासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. जून हा पर्यावरण महिना म्हणून साजरा केला जातो. या पर्यावरण मासानिमित्ताने वनासंबंधीची माहिती मिळण्यासाठी, ऑक्सिजनची निर्मिती व पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, म्हणून वन विभागाशी समन्वय साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या समन्वयक सुषमा पालव व सहायक शिक्षिका उमा बोयान यांच्या उपस्थितीत चौथीतील विद्यार्थ्यांनी कोलगावच्या जंगलात सुरंगी व वडाच्या झाडांची लागवड करत पर्यावरण दिन साजरा केला.
वन विभागातर्फे विद्यार्थ्यांना प्रमोद राणे व श्री. भोजणे तसेच त्यांचे सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. ते म्हणाले की, ही झाडे जगायला थोडा उशीर होतो. पण, ही झाडे एकदा जगली की त्यांचे आयुष्य २०० ते ३०० वर्षांचे असते. ही विस्तीर्ण होतात, त्यामधून परागीभवन होते. मधमाशांना त्यांचे अन्न म्हणजेच मध प्राप्त होते. वडाच्या झाडांच्या एकेका मुळात १०० ते २०० लिटर पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण सुरक्षित राहते. आसपास विहीर असल्यास त्या विहिरीला भरपूर पाणी उपलब्ध होते. हे झाड सर्वांत जास्त ऑक्सिजन देणारे झाड आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करणे ही आपली व येणाऱ्या भावी पिढीची जबाबदारी आहे. या झाडांचे जतन करून आपल्या पुढच्या पिढीसाठी हा वारसा आपण टिकवून ठेवू शकतो.
प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर यांनी उपक्रमास प्रोत्साहन दिले. या झाडांसाठी कोलगाव जंगलात वसुंधरा दिनानिमित्त एप्रिलमध्ये जे जलस्त्रोत म्हणून जे जंगली प्राण्यांसाठी दोन पाणवठे तयार केले होते, त्यालाच लागून जूनमधील पर्यावरण दिनी पर्यावरणाशी सतत नाळ जोडलेली असावी, हीच संकल्पना असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पावसाळ्याचा ऋतू संपल्यानंतरही पाण्याची व्यवस्था करून झाडांचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. वनविभाग अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गूळ व शेंगदाण्याचे नैसर्गिक पद्धतीने बनविलेले लाडू देऊन शरीरास पौष्टिक असे अन्नपदार्थ सेवन करण्याचे महत्त्व पटवून दिले. संचालक पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.