जांभेकर विद्यालयात योग दिन
जांभेकर विद्यालयात योग दिन
रत्नागिरीः गोदूताई जांभेकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी व प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा शिक्षक महेंद्र पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी योगासनांचे सादरीकरण केले. एनसीसीच्या विद्यार्थिनींनी देखील एनसीसी शिक्षिका स्नेहल पावरी यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने सादर केली.
---------
72306
पित्रे योग केंद्रातर्फे योग दिन
रत्नागिरी ः राष्ट्रीय सेवा समितीच्या बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्रामार्फत लक्ष्मणराव लिमये संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिवस झाला. येथे वस्तीतील शाखेचे स्वयंसेवक, नागरिक बंधू- भगिनी सहभागी झाले. योग दिवसाच्या संहितेमध्ये अंतर्भूत आसनांपैकी सूर्यनमस्कार, उभ्या व बैठक स्थितीमधील आसने, प्राणायाम आणि ओंकारसाधना करण्यात आली. केंद्राच्या नियमित वर्गाच्या साधकांनी त्यांच्या साधनेमधील काही आसनांची प्रात्यक्षिके सादर केली. एकूण ३१ जणांनी साधनेत सहभाग घेतला. संस्थेच्या गोळवली येथील ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत सरंद या गावी योग साधना आयोजित केली होती तिथे ५० उपस्थिती होती.
---------------------
पित्रे महाविद्यालयात योग दिन
साडवली ः : देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात जागतिक योग दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचे योग प्रात्यक्षिक सादरीकरण, योगविषयक ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी योगाभ्यासाचे शारीरिक व मानसिक आरोग्याच्यादृष्टीने महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
-----------
आगाशे विद्यालयामध्ये योग दिन साजरा
रत्नागिरी : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यालयात विद्यार्थ्यांनी शाळेची माजी विद्यार्थिनी आर्या केळकर (एम. एस्सी. योग थेरपीस्ट) हिच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, सूर्यनमस्कार घालत योग दिन साजरा केला. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले. आर्या केळकर हिने योग दिनाचे महत्त्व, योगासनांचे आपल्या शरीर व मनाला होणारे फायदे सांगितले. नंतर सर्वांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली. यामध्ये सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, उष्ट्रासन, त्रिकोणासन, हस्तपादासन, वज्रासन, गोमुखासन, मार्जारासन, सेतूबंधासन, पवनमुक्तासन आदी योगासने केली. भ्रामरी, ॐकार आणि शवासन घेण्यात आले. कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये स्वतंत्र योगशिक्षिका स्वाती मलुष्टे असून त्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणे योगासने शिकवत असतात. त्यामुळे योग दिन उत्साहात साजरा झाला. सूत्रसंचालन मंजिरी गुणे यांनी केले.
-----------
महिला मंडळातर्फे ध्यानधारणा
रत्नागिरी ः जागतिक योगदिनानिमित्त मारुती मंदिर येथील महिला मंडळाच्या सभागृहात ध्यानधारणा कार्यक्रम झाला. यामध्ये सुजाता चितळे यांनी योगसाधना व ध्यानसाधना याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले व सर्वांकडून ध्यान करून घेतले. ध्यानाबरोबर साधकाने आहार- विहार शुद्ध करणे गरजेचे आहे, असे त्यांनी निरनिराळी उदाहरणे देऊन सांगितले. अध्यक्ष मेघना शहा यांनी मनोगत व्यक्त केले. माजी अध्यक्ष मोहिनी पटवर्धन यांनी चितळे यांचे स्वागत केले. गीता वैद्य यांनी ओळख करून दिली. आरती पाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. राखी लांजेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.