सिंधुदुर्ग न्यायालय संकुल

सिंधुदुर्ग न्यायालय संकुल

Published on

72509

सिंधुदुर्ग न्यायालय संकुल
ओरोस ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशान्वये किमान संयुक्त कार्यक्रमांतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे शनिवारी (ता. २१) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. डी. गुंडेवाडी, दिवाणी न्यायाधीश (क स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी ओ. ओ. चेंडके, सहदिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी ओ. जी. देशिंगकर, आर. व्ही. नडगदल्ली, एस. जे. पाटील, लोक अभिरक्षक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हा न्यायालय संकुलातील प्रबंधक सुकांत सावंत, सर्व कर्मचारी, भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, योग शिक्षक डॉ. तुळशीराम रावराणे, प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट सिंधुदुर्ग, योग शिक्षक उपस्थित होते. डॉ. रावराणे यांनी योग प्रशिक्षण दिले. श्री. मालकर यांनी आभार मानले.
.................
72510

सिंधुदुर्ग पोलिस दलातर्फे प्रात्यक्षिके
ओरोस ः जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये पोलिस अधीक्षक, डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्यासह सिंधुदुर्ग पोलिस दलातील दहा पोलिस अधिकारी व १४१ पोलिस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला. योग शिक्षक चंद्रकांत परब यांनी योगाभ्यास घेऊन पोलिस अधिकारी व अंमलदार यांना दैनंदिन कामकाजातून तणावमुक्त राहण्यासाठी सोपी योगासने प्रात्यक्षिकांसह दाखविली. पोलिस अधीक्षक दहिकर यांनी पोलिस अधिकारी व अंमलदार यांना दररोज योग व व्यायाम कसा महत्वाचा आहे, याबद्दल मार्गदर्शन केले.
....................
72511

सिंधुदुर्गनगरीतील एसपीके महाविद्यालय
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. एनएसएस, एनसीसी, डी.एल.एल.ई. आणि क्रीडा विभागाने यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर होते. एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. यू. सी. पाटील, डॉ. सुनयना जाधव, प्रा. रोहन सावंत ,एनसीसी एएनओ डॉ. सचिन देशमुख, डॉ. विशाल अपराध, सीटीओ प्रा. कविता तळेकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. एन. हिरामणी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. यू. एल. देठे, योगप्रशिक्षक प्रदीप्ती कोटकर, रिया सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. योगप्रशिक्षक कोटकर व सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान प्रकार शिकविले. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रा. तळेकर यांनी योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com