''दशावतारा''ला राजाश्रयासाठी प्रयत्न

''दशावतारा''ला राजाश्रयासाठी प्रयत्न

Published on

swt248.jpg
72726
कुडाळः तालुका पारंपरिक दशावतार कलावंत बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने आयोजित ‘माझा लोकराजा’ महोत्सवात कलावंतांचा सत्कार करताना दत्ता सामंत. बाजूला दादा साईल, प्राजक्ता बांदेकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘दशावतारा’ला राजाश्रयासाठी प्रयत्न
दत्ता सामंतः कुडाळात ‘माझा लोकराजा’ महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ः दशावतार कलावंतांनी पारंपरिक कला जोपासली पाहिजे. शिवसेना-भाजप महायुती व आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून दशावतार लोककलेला राजाश्रय देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी लवकरच जिल्ह्यातील सर्व दशावतार कलावंतांचा मेळावा कुडाळ येथे घेतला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे आयोजित केलेल्या ‘माझा लोकराजा’ महोत्सवात दिली.
कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलावंत बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात ‘माझा लोकराजा’ महोत्सव आयोजित करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, अरविंद करलकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, पणदूर हायस्कूलचे शिक्षक अविनाश वालावलकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर, अॅड. पी. डी. देसाई, प्रेमानंद देसाई, अॅड. सोनू गवस, सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार कलाकार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर, केरवडे उपसरपंच अर्जुन परब, दिलीप सावंत, दशावतार कलाकार पपू नांदोसकर, दत्तप्रसाद शेणई, दिनेश शिंदे, स्वरुप वाळके, सिद्धेश कलिंगण, पखवाज वादक महेश सावंत, विनायक घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘‘दशावतार कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. कलावंतांच्या व्यथा वरिष्ठांकडे मांडण्यात येतील. त्यांना न्याय मिळेल, अशी मला खात्री आहे.’’
यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार (कै.) महादेव लोट व दशावतारातील ज्येष्ठ पखवाज वादक (कै.) अशोक नेरुरकर यांच्या कुटुंबीयांसह दशावतारातील ज्येष्ठ कलाकार सुरेश धुरी (माणगाव), ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रकाश आकेरकर (आवेरे) व ज्येष्ठ कलाकार पंढरीनाथ सामंत (आंदुर्ले) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांच्या संचात ‘रक्तपिसासू रक्ताक्षी’ नाटक सादर करण्यात आले. सूत्रसंचालन हरेश नेमळेकर, सन्मानपत्र वाचन मोरेश्वर सावंत यांनी केले. आभार विघ्नराजेंद्र कोंडुरकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com