मंडणगड-शेनाळे शाळेत सोलर बेस्ड वॉटर प्युरिफायर
Rat24p24.jpg-
72757
सोलरबेस्ड वॉटर प्युरिफायर.
-Rat24p25.jpg-
72758
शेनाळे : सोलरबेस्ड वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन करताना जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी सोबत शिक्षक, पालक.
---------
शेनाळे शाळेत सोलरबेस्ड वॉटर प्युरिफायर
ॲशरे मुंबई चाप्टर संस्थेचे सहकार्य; भौतिक सुविधेत भर, विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २४ ः मुलांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून जागतिक स्तरावर काम करणारी ॲशरे मुंबई चाप्टर या संस्थेच्या माध्यमातून शेनाळे शाळेत सोलरबेस्ड वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले. त्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधेत एका महत्वाच्या शैक्षणिक आवश्यकतेची गरज पूर्ण झाली आहे.
शेनाळे शाळा ही तालुक्यातील उपक्रमशील शाळा असून, तालुक्यात एकमेव आयएसओ मानांकन प्राप्त शाळा आहे. शाळा भौतिक सुविधांनी परिपूर्ण व्हावी यासाठी शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक सुनील आईनकर हे विविध देणगीदारांच्या माध्यमातून शैक्षणिक उठाव करून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करत आहेत. ॲशरे मुंबई चाप्टर ही संस्था रेफ्रिजरेशनमधील जागतिक स्तरावर काम करणारी संस्था असून, ती पर्यावरणपूरक ऊर्जा स्त्रोतवाढीसाठी कार्य करत आहे. या संस्थेच्यावतीने सचिन दळवी यांच्या सौजन्याने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असणारे सोलर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे वॉटर प्युरिफायर शाळेत बसवून मोलाचे योगदान दिले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा रत्नागिरी जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनंत जाधव, माजी सरपंच विश्वनाथ सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित सालेकर, पूजा कुटेकर, सुष्मिता मनवे, सुप्रिया धोंडगे, समीक्षा कदम, अर्पिता सालेकर असे अनेक मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील शाळेला एवढ्या मोठ्या किमतीचा सोलरवॉटर प्युरिफायर दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश गुळेकर, सतीश खैरे, संध्या शेले यांनी उत्तम नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.