मेढा निवती उपसरपंच प्रज्योत मेतरांचा सत्कार
72892
मेढा निवती उपसरपंच
प्रज्योत मेतरांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २५ ः मेढा निवतीच्या उपसरपंचपदी प्रज्योत मेतर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गोविंद जाधव यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते. या रिक्त असलेल्या पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली.
यावेळी उपसरपंच पदासाठी मेतर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच अवधूत रेगे, ग्रामपंचायत सदस्य नमिता घाटवल, शीतल पाटकर, प्राजक्ता निवतकर, प्रकाश खोबरेकर, गुरुष्का कोचरेकर, अनिशा आमडोसकर, तृप्ती कांबळी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच मेतर यांचे सरपंच, सदस्य व कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

