वडाच्या फांद्यांचे संकलन आणि रोपण

वडाच्या फांद्यांचे संकलन आणि रोपण

Published on

- rat२५p११.jpg-
P२५N७२९५६
चिपळूण ः वडांच्या फांद्याचे रोपण करताना निसर्गप्रेमी.

वडाच्या फांद्यांचे संकलन, रोपण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः वनस्पती लागवड, जोपासना आणि संवर्धन अभियानांतर्गत खांदाट-पाली गावपरिसरातील वटवृक्षांच्या फांद्यांचे संकलन आणि रोपण उपक्रम राबवण्यात आला होता. पर्यावरणस्नेही आणि निसर्गप्रेमी जलयोद्ध्यांनी प्रत्यक्ष कृतीत सहभागी होत हा उपक्रम राबवला.
खांदाट येथील या उपक्रमात जलदूत शहानवाज शाह, समीर कोवळे, पृथ्वीराज पवार आणि दिगंबर सुर्वे यांचा महत्वाचा वाटा आहे. वटवृक्षाच्या सजीव फांद्या काटेकोरपणे संकलित करून त्या विविध ठिकाणी पुनर्लागवड करण्याची मोहीम या माध्यमातून राबवली जात आहे. या फांद्यांचे रोपण पृथ्वीराज पवार यांच्या ‘गोवर्धन ॲग्रो फार्म मार्कंडी’ आणि रामशेठ रेडीज यांच्या एसआर जंगल रिसॉर्ट धामणवणे येथे करण्यात येत आहे. हे दोन्ही प्रकल्प पर्यावरणाच्या जपणुकीसाठी सतत आग्रही आहेत. स्थानिक निसर्ग परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांना त्यांनी आपली जागा खुली करून दिली आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com