मुंबई प्रीमियर लीगमध्ये नायशीचा रोहन घाग चमकला
- rat२५p६.jpg -
P२५N७२९५७
रोहन घाग
----
मुंबई प्रीमियर लीगमध्ये नायशीचा रोहन घाग चमकला
उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन ; रॉयल्स संघाच्या विजयात मोलाची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २५ : चिपळूण तालुक्यातील नायशी येथील रोहन घाग याने नुकत्याच पार पडलेल्या मुंबई प्रीमियर लीग (एमपीएल) टी-२० स्पर्धेत भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. संघातील त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मराठा रॉयल्स संघाने यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
रोहन गेल्या काही वर्षांपासून मुंबईमधून क्रिकेट खेळत आहे. गेल्या वर्षी त्याने मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. रिलायन्स टुर्नामेंट आणि कूच बिहार टुर्नामेंटसारख्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने चांगला खेळ केला. या व्यतिरिक्त त्याने कांगा लीग, टाइम्स शील्ड, राठोड ट्रॉफी, प्रेसिडेंट कप, पुरूषोत्तम शील्ड, इंटरकॉलेज टुर्नामेंट अशा विविध प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये द्रुतगती गोलदांज म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. रोहनने लहानपणापासूनच क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सध्या तो मुंबईत शिवडी येथे राहत असून, वरळी येथील पोद्दार महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. डाव्या हाताचा जलदगती गोलंदाज म्हणून रोहन घागची मुंबई प्रीमियर लीग (एमपीएल) टी-२० स्पर्धेत मराठा रॉयल्स संघात निवड झाली होती. आपल्या अचूक आणि वेगवान गोलंदाजीने त्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी संघाला यश मिळवून दिले. त्याच्या भरीव योगदानामुळेच मराठा रॉयल्स संघाने स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले. रोहनच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी दूरध्वनीवरून त्याचे अभिनंदन केले. त्याच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.