वाशी रस्त्यावर धोकादायक खड्डा
- rat२५p८.jpg-
२५N७२९५८
संगमेश्वर ः संगमेश्वर-वाशी रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा.
---
संगमेश्वर-वाशी रस्त्यावर धोकादायक खड्डा
वाहनचालकांची कसरत ; अपघाताचे वाढले धोके, प्रशासनाकडून दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः संगमेश्वर-वाशी रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच हा रस्ता खराब होऊ लागला आहे. विशेषतः गोपाळवाडी परिसरातील मोरीवर निर्माण झालेला खोल खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संगमेश्वर-वाशी रस्त्यावरील गोपाळवाडी येथील मोरीवर दोन्ही बाजूंनी रस्ता खचला आहे. त्यामुळे तिथे मोठा खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा इतका खोल आहे की, रात्रीच्या अंधारात गाडी त्यात गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांसाठी हे ठिकाण अतिशय धोकादायक ठरत असून, अनेकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर या खड्ड्यामुळे अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. पावसामुळे हा खड्डा मोठा होणार असून, रस्त्यावर अन्य ठिकाणीही खड्डे पडण्याची शक्यता आहे. मोठे खड्डे वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे आणि मोरीच्या बाजूंचे योग्य दुरूस्तीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
---
तातडीने उपायोजना आवश्यक
संगमेश्वर-वाशी रस्त्याची दुरूस्ती झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच रस्ता खराब झाला आहे. गोपाळवाडी परिसरातील मोरीवर तर खोल खड्डा पडला आहे. हा खड्डा वाहन चालकांसाठी मोठा धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात या खड्डात पाणी साचल्याने खड्ड्याचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे धोके वाढले आहेत. याकडे आता संबधित प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने उपायोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

