ःसर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी पतसंस्था कटीबध्द
- rat२५p१६.jpg-
२५N७३०१३
राजापूर ः येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी योगशिक्षिका रमा जोग, श्रुती ताम्हणकर, शिल्पा मराठे, प्रसन्न मालपेकर आणि अन्य.
---
सर्वोत्तम सेवा देण्यास पतसंस्था कटिबद्ध
श्रुती ताम्हणकर ः राजापूर महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ : राजापूर महिला नागरी पतसंस्थेने सभासद आणि ग्राहकांच्या पाठिंब्यानेच आजवरची प्रगती साधली असून, सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्याचा संस्थेने नेहमीच प्रयत्न केला आहे. आगामी काळातही सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी पतसंस्था कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रुती ताम्हणकर यांनी केले. रौप्य महोत्सवी कार्यक्रमावेळी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम शहरातील नगर वाचनालयाच्या सभागृहात झाला. या वेळी ताम्हणकर यांच्यासह मीना मालपेकर, योग प्रशिक्षिका रमा जोग, संस्था उपाध्यक्ष श्रद्धा धालवलकर, रसिका कुशे, शिल्पा मराठे, शुभांगी सोलगावकर, शीतल पटेल, स्नेहा कुवेसकर, सुनीता व्हनमाने, सुधा चव्हाण, सल्लागार प्रसन्न मालपेकर, सचिव प्रेरणा अमरे, माधवी हर्डीकर, प्रतिभा मराठे, प्रतिभा रेडीज, गोठणकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. या वेळी ताम्हणकर म्हणाल्या, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनिता अभ्यंकर यांनी २१ जून २००१ रोजी काही मैत्रिणींच्या साथीने पतसंस्थेचे छोटे लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वेळी माजी अध्यक्षा माधवी हर्डीकर, संचालिका मराठे यांनीही आपले विचार मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

