-ओणी-अणुस्कूरा रस्त्याच्या दुतर्फा झाडी
- rat25p18.jpg-
25N73018
राजापूर ः ओणी-अणुस्कुरा मार्गांवर लोंबकळणारे बांबू.
ओणी-अणुस्कुरा मार्गावर झाडी
वाहनचालकांना त्रास ; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 25 : तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी आणि रस्त्यावर लोंबकळणारे बांबू याचा मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे. झाडांच्या फांद्या आणि बांबू तत्काळ हटवल्या जाव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून केली जात आहे.
तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा वाहनांची सातत्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीचा त्रासही दरवर्षी उद्भवणारी समस्या आहे. त्याप्रमाणे यावर्षीही वाहनचालकांना वाढलेल्या झाडीचा त्रास सहन करावा लागत आहे. झाडाच्या फांद्या आणि लोंबकळणारे बांबू वाहनांवर आपटून अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. दुचाकीचालकांची अवस्था अधिक बिकट होत आहे. दुचाकी चालवताना समोर पाहायचे की, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी चुकवायची, अशी अवस्था चालकाची होते. त्यात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची भर पडलेली आहे. त्यामुळे मार्गावरून वाहने चालवणे त्रासदायक बनलेले आहे. ओणी-अणुस्कुरा मार्गांवरील दरवर्षीच्या या त्रासाकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. ओणी, सौंदळ, खडीकोळवण, रायपाटण आदी भागात रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तातडीने साफ करावीत, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

