१५० गावे हर घर जलच्या प्रतिक्षेत
राजापुरातील १५० गावे ‘हर घर जल’च्या प्रतिक्षेत
जलजीवन मिशन योजना; निधीचा अभाव, योजनेला मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत राजापूर तालुक्यातील ५० गावे हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत. तर सुमारे दीडशे गावे प्रतिक्षेत आहेत. जलजीवन योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यावर शासन आणि प्रशासनाचा भर असून, त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शासनाने या योजनेला मुदतवाढ दिली आहे; मात्र, पुरेसा निधी मिळत नसल्याने सर्व गावे शंभर टक्के हर घर जल करण्यात अडचण निर्माण झाली आहे.
घरोघरी नळजोडण्यांद्वारे मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासनातर्फे जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत होती; मात्र निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण होऊ न शकल्याने मार्च २०२८ अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर प्रयत्नही सुरू झाले आहेत. सध्या राजापूर तालुक्यात मंजूर झालेल्या ११२ कोटी रुपये निधीतून २०० महसुली गावांमध्ये कामे सुरू आहेत. त्यातील बहुसंख्य कामे प्रगतीपथावर आहेत; परंतु या योजनेसाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यामुळे कामांचा वेग मंदावला आहे. मुदतवाढीचा फायदा कामे पूर्ण करण्यासाठी होणार असला तरीही वेळेत निधी दिला गेला नाही तर ठेकेदाराकडून कामाचा वेग कायम राहणे अशक्य आहे. याचा विचार करा, अशी मागणी ठेकेदारांकडून केली जात आहे.
---
दृष्टिक्षेपात जलजीवन मिशन योजना
एकूण गावे* २००
मंजूर निधी* ११२ कोटी
हर घर जल घोषित गावे* ५०
८० टक्के प्रगतीपथावर कामे* ५०
एकूण खर्च* ३० कोटी
---
हर घर जल घोषित झालेली गावे
शिवणेखुर्द, बुरंबेवाडी, बाकाळे, दसूरवाडी, पोकळेवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, निवेली, तेरवण, थोरलीवाडी, साखर, येरडव, गोठीवरे, कारवली, कशेळी-वरचीवाडी, दसूर, कोंभे, सागवे-पालये, खिणगिणी, जैतापूर-बाजारवाडी, सौंदळ-मुसलमानवाडी, नाणार-वाडीचिवारी, कुंभवडे-हरचलेवाडी, कुंभवडे, डोंगर-दत्तवाडी, मठखुर्द, सोलगाव, कुवेशी-तुळसुंदेवाडी, वाडावेत्ये, गोठणेदोनिवडे, वावूळवाडी, बारसू, भाबलेवाडी, निखरेवाडी, कोदवली-मांडवकरवाडी, मोगरे, केरावळे, सागवे जांभारी, देवीहसोळ, कोंडसरबुद्रुक, बेनगी, वडदहसोळ-खालचीवाडी, पळसमकरवाडी, करेल, डोंगर-मुसलमानवाडी, परटवली.
----
कोट
राजापूर तालुक्यातील ५० गावे हर घर जल घोषित झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी ५० कामे ८० टक्के पूर्ण झालेली आहेत. शिल्लक सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- प्रशांत पवार, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.