श्रीकांत पाटील यांना कोकण भूषण पुरस्कार
rat२५p१३.jpg-
२५N७२९८८
मुंबई ः कोकण भूषण पुरस्कार स्विकारताना ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत पाटील.
श्रीकांत पाटील यांना
कोकण भूषण पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ः मुंबई येथील कोकणदीपतर्फे दिला जाणारा कोकण भूषण पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी व बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांना देऊन गौरवण्यात आले.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात आला. पाटील हे गेली २३ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी १९९० पासून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. ग्रंथालयाला ब वर्ग मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नाट्यस्पर्धेत संस्थेला सांघिक आणि वैयक्तीक अशी अनेक बक्षिसे मिळवून दिली आहेत. ग्रंथालयाच्या नावावर अनेक प्रमाणपत्रे व रौप्यपदकं आहेत. समर्थ रंगभूमीच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी केले आहेत. या कामाची दखल घेऊनच पाटील यांना कोकण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.