चिपळूण  आगाराचे कामकाज शिवाजीनगरवरुन

चिपळूण आगाराचे कामकाज शिवाजीनगरवरुन

Published on

- rat२५p२०.jpg-
२५N७३०५१
चिपळूण येथील शिवाजीनगर बसस्थानकाचे संग्रहित छायाचित्र.

चिपळूण आगाराचे काम शिवाजीनगरवरून
पुराच्या शक्यतेने कार्यवाही; एसटीच्या फेऱ्या मध्यवर्ती बसस्थानकातूनच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, २५ : पुराच्या भीतीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे कामकाज शिवाजीनगर येथील बसस्थानकावर हलवण्यात आले आहे. एसटीचे सर्व अधिकारी शिवाजीनगर येथून कामकाज करणार असले तरीही एसटीच्या फेऱ्या मात्र मध्यवर्ती बसस्थानकातूनच सुटणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चिपळूण शहरात पुराचे पाणी भरल्यानंतर प्रथम मध्यवर्ती बसस्थानकात पाणी शिरते. मागील पाच वर्षापासून मध्यवर्ती बसस्थानकात पाणी आले होते. किमान दोन ते अडीच फूट पाणी भरल्यानंतर एसटीच्या फेऱ्या चालवणे अवघड होते. महापूर आला तर कार्यालयातील दस्तऐवज आणि इतर साहित्याचेही नुकसान होते. २०२१च्या महापुरामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले. तेव्हापासून एसटीच्या अधिकाऱ्यांनी धडा घेतला असून, पूर येण्यापूर्वी साहित्य आणि एसटीचे कामकाज सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवाजीनगर येथील बसस्थानकाचा पर्याय निवडण्यात आला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या पूर्वी शिवाजीनगर बसस्थानकावर जात होत्या. त्यानंतर त्या पुढे मार्गस्थ होत होत्या तसेच मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या बस शिवाजीनगर बसस्थानकावर जात होत्या. आता मात्र सर्वच एसटीच्या फेऱ्या या शिवाजीनगर बसस्थानकावरून सुटणार आहेत. त्यानंतर त्या मध्यवर्ती बसस्थानकावर जातील आणि तेथून ठरलेल्या मार्गावर जातील. मध्यवर्ती बसस्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर किमान १५० ते २०० गाड्या लागतील एवढी मोठी जागा आहे. पावसाळ्याचे चार महिने हा बदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
..............
कोट
चिपळूणमध्ये महापूर आला तर एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी शिवाजीनगर बसस्थानकावरून आम्ही कामकाज करणार आहोत; मात्र त्याचा प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पावसाचे चार महिने प्रवाशांनी सहकार्य करावे.
- दीपक चव्हाण, आगारप्रमुख चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com