कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत खत द्या
शेतकऱ्यांना वेळेत खत द्या
प्रशांत यादव ः जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः निसर्गातील बदलांमुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे तर दुसरीकडे सध्या शेतकऱ्यांना गरज असतानाही युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत खताचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. शिवकुमार सदाफुले यांच्याकडे केली आहे.
चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तालुक्यात खरीप हंगाम २०२५-२६ करिता शेतकऱ्यांकडून युरिया खताची ११०० मेट्रिक टनाची मागणी आहे; मात्र अद्यापपर्यंत केवळ ६२२ मेट्रिक टनापर्यंत युरिया खताचा पुरवठा झाला. यंदा पावसाळा लवकर सुरू झाला. थोडे दिवस विश्रांती घेतल्यानंतर चिपळूण तालुक्यात सर्वत्र शेतीच्या मशागतीची कामे हाती घेण्यात आली. पुढे भातलावणीच्या कामांनाही जोर आला आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील सहकारी सोसायट्या तसेच खतविक्रेत्यांकडे आपल्या विभागाकडून पुरवठा करण्यात आलेल्या युरिया खताचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांकडून भातलावणीसाठी युरिया खताची मागणी वाढली असताना चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी खताचा साठा शिल्लक नाही, असे सांगितले जात आहे. खत शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आता लावणीची कामे सुरू असताना वेळेत खताचा पुरवठा न झाल्यास खोळंबा होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, तालुक्यात युरिया खताचा पुरवठा तातडीने करावा, अशी मागणी यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

