क्राईम

क्राईम

Published on

सार्वजनिक ठिकाणी
मद्यपिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील पाच वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाचजणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर भालचंद्र नागले, प्रमोद दीपक मसुरकर, सत्यजित उत्तम रसाळ, मनोहर श्रीकृष्ण जांभळे, अशोक देवू शितप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी (ता. २४) या कालावधीत शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम, मांडवी, नाचणे-पॉवरहाऊस या ठिकाणी निदर्शनास आल्या. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रोहित मांगले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पावस येथील
वृद्धाचा मृत्यू
पावस ः फुप्फुसाच्या गंभीर आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या एका वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सखाराम भिकाजी पावसकर (वय ७०, रा. पावस, खारवीवाडा, ता. जि. रत्नागिरी) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

कॉजवेवरून पडून
तरुणाचा मृत्यू
देवरूख ः काजळी नदीवरील कॉजवेवरून चालत जात असताना पाण्यात पडून एका ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ जूनला देवरूखजवळील देवपट्टा येथे घडली. दीपक अंकुश गोरूले (वय ३९, रा. तिवरेतर्फे देवळे, ता. संगमेश्वर) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरूले हा २४ जूनला सायंकाळी ४.३० ते रात्री ८.१४ या वेळेत महावितरण सबस्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या देवपट्टा येथील काजळी नदीवरील सिमेंटच्या पुलाजवळच्या कॉजवेवरून चालत होता. त्याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो कॉजवेवरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पडला आणि प्रवाहात वाहून गेला. स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर तत्काळ त्याचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू असताना गोरूले मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे तिवरेतर्फे देवळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बावनदीत दुचाकीसह ५० हजारांचा ऐवज लंपास

संगमेश्वर ः बावनदी येथील खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० ते ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ च्या दरम्यान घडली असून, २४ जून २०२५ रोजी रात्री ८.१२ वाजता संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम सुनील शिवलकर (२९, रा. जाकीमिऱ्या, आलावा पाटीलवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावरील (एम.एच.०८ ए.डब्ल्यु ७५०१) क्रमांकाची दुचाकी त्यांनी त्यांचा मित्र आयुष समीर सावंत याला देवरूख येथे जाण्यासाठी दिली होती. देवरूखवरून परत येत असताना गाडीची साखळी तुटल्यामुळे आयुषने ती गाडी बावनदीजवळील देवरूखकडे जाणाऱ्या रस्त्यावर, खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली होती. त्यानंतर, शुभम शिवलकर देवरूखला जात असताना त्यांनी बावनदी येथे आपली गाडी पाहिली असता ती जागेवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; परंतु गाडी मिळून आली नाही. अखेरीस, आपली गाडी चोरून नेल्याची खात्री पटल्याने शुभम शिवलकर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

------------
rat२५p२४.jpg ः नवनाथ नाचणेकर

मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू

राजापूर ः तालुक्यातील अणसुरे म्हैसासूरवाडी येथील नवनाथ नाचणेकर (वय ३१) या युवकाचा मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह शेवडीवाडी खाडीकिनारी आढळून आला. नाचणेकर २४ जूनला सकाळी मासेमारीसाठी समुद्रात गेला होता. मासे पकडून तो परत येत असतानाच अचानक समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यामध्ये अडकून बुडाला आणि त्यानंतर दिसेनासा झाला. नाटे पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येताना काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृतदेह शेवडीवाडी खाडीकिनारी पाण्यात सापडला. या प्रकरणी अधिक तपास नाटे पोलिसांकडून सुरू आहे.

ऑपरेटर/बातमीदार- बाईत.....२५-६-०२५.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com