

शिडीवरून बंद घरात उतरून
पंधरा हजार रुपयांची चोरी
केसरीतील प्रकार; संशयितावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः केसरी धनगरवाडी येथे बंद घरात शिडीद्वारे उतरून कपाटातील सुमारे १५ हजार रुपये रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २४) घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित चोरट्याने मंगळवारी सायंकाळी उशिरा केसरी-धनगरवाडी येथे भरवस्तीत असलेल्या धुळू मुळू पांढरमिसे यांच्या घरावर शिडीने चढून आत प्रवेश केला. भर दिवसा झालेल्या या चोरीच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढरमिसे दांपत्य मंगळवारी सकाळी कामाला गेले होते. सौ. पांढरपिसे दुपारी अडीचच्या सुमारास घरी आल्यावर त्यांना घरातील साहित्य विस्कटल्याचे दिसले. चोरट्याने प्रथम घराचा दर्शनी भागाचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. त्यानंतर पाठीमागे असलेल्या शिडीद्वारे छपरावर चढून त्याने घरात प्रवेश केला. तांदळात लपवलेली कपाटाची चावी शोधून काढत कपाट उघडले आणि १५ हजार रुपये रक्कम चोरली. कागदपत्रेही विस्कटली. सरपंच स्नेहल कासले, उपसरपंच संदीप पाटील, पंच सदस्य गुरू कासले, जयानंद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार दीपक शिंदे, रामदास जाधव, लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी भेट देत तपास केला. संशयित चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चोरटा कोणी माहितगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.