दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकपदी महेश तोरस्कर

दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकपदी महेश तोरस्कर
Published on

rat29p5.jpg-
73966
महेश तोरस्कर

दापोली पोलिस ठाण्याच्या
निरीक्षकपदी महेश तोरस्कर
दापोली, ता. २९ ः दापोली पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरस्कर यांनी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता पदभार स्वीकारला. तोरस्कर यांना पोलीस खात्यातील २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पनवेल शहर, कळंबोळी, मुंबई सायन, ट्रॉम्बे, तसेच क्राईम ब्रँच युनिट-६ चेंबूर येथे सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) म्हणून सहा वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.
वडाळा येथे त्यांनी प्रथमच पोलीस निरीक्षक (पीआय) म्हणून काम पाहिले. तसेच रत्नागिरी आणि देवरुख येथेही त्यांचे कार्य कौतुकास्पद राहिले आहे. दापोलीत पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तोरस्कर यांनी सांगितले की, दापोली तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी कडक मोहीम राबवली जाणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com