कुडाळ, कणकवलीत ‘व्हेरिकोज व्हेन्स’

कुडाळ, कणकवलीत ‘व्हेरिकोज व्हेन्स’

Published on

कुडाळ, कणकवलीत
‘व्हेरिकोज व्हेन्स’
सावंतवाडी ः अथायू हॉस्पिटल, कोल्हापूर, श्रीराम हॉस्पिटल, कुडाळ व संजीवनी हॉस्पिटल, कणकवलीच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ५ जुलै या कालावधीत सकाळी ११ ते २ या वेळेत अनुक्रमे कुडाळ व कणकवली येथे मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात पाय सुजणे, सायंकाळी पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे, पायाच्या नसा निळ्या होणे, पायाच्या नसा फुगीर होणे अशी लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात. ‘व्हेरिकोज व्हेन्स’ हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळतो. शिबिरास येताना सर्व जुने रिपोर्ट, आधारकार्ड व शिधापत्रिका घेऊन यावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीईओ डॉ. बसवराज कडलगे यांनी केले आहे.
--------
पाडलोस संगीत
विद्यालयाचे यश
बांदा ः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी (मिरज) यांच्यातर्फे घेतलेल्या एप्रिल-मे सत्रातील विविध संगीत वाद्य परीक्षेत तबला पखवाज विषयात श्री देव इसवटी संगीत विद्यालय, पाडलोसच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थी असे : प्रारंभिक परीक्षा-लक्ष्मण गवस, रुद्र बुराण, बाळकृष्ण कदम, रोहन धुरी, अनुवेदा घोगळे. प्रवेशिका प्रथम-करिष्मा परब, श्रेयस पेडणेकर, आत्माराम कासकर, कार्तिक राणे, मुकेश गवस, अक्षय खर्डे, संकेत परब, सुयश गवस. प्रवेशिका पूर्ण-निहाल उक्षेकर, रितेश सावंत, भरत सावंत, पियुष गावडे. मध्यमा प्रथम-राज कोटकर, शुभम सावंत, ऋतिक सावंत, आबाजी देसाई. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संचालक व शिक्षक पखवाज अलंकार अमेय गावडे यांनी अभिनंदन केले.
....................
देवगड येथे गुरुवारी
शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’
देवगड ः येथील आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघाच्या वतीने गुरुवारी (ता.३) सकाळी १०.३० वाजता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘आक्रोश’ मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा येथील गणेश उद्यान मंदिर येथून निघून तहसील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वातावरणात जाणार आहे. या मोर्चात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ अध्यक्ष विलास रुमडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com