...म्हणून डॉक्टरांना दिला जातो देवाचा दर्जा
डॉक्टर्स डे विशेष पुरवणी--------डोकं
इंट्रो
आठवा तो कोरोनाचा भयानक काळ....जेव्हा लोक घरात बंद होते आणि डॉक्टर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत होते. डॉक्टरांचे हे योगदान खरंच कौतुकास्पदच आहे. ते लोकांना जीवन देतात. कोणत्याही साथीच्या आजारात ते आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रुग्णांची काळजी घेतात, त्यांचा जीव वाचवतात. राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी एक जुलै रोजी अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, जे रुग्णांना आपले कुटुंब मानतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो.
- डॉ. पराग यादव, चिपळूण
----------
...म्हणून डॉक्टरांना दिला जातो देवाचा दर्जा
आमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना पाहूनच मला खूप बरे वाटते, अशा प्रतिक्रिया अनेकवेळा रुग्णांकडून ऐकायला मिळतात. औषधे ही शारीरिक आजारांना बरे करतात; पण मानसिक स्वास्थ्य हे डॉक्टरांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहूनच मिळते. अनेकांना हा अनुभव आलेला असेलच. गेल्या काही वर्षात फॅमिली डॉक्टर या संकल्पनेबरोबरच तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढत आहे. थोडा आजार वाढला की, तज्ज्ञ डॉक्टरांची भेट ठरलेली आहे; परंतु, अनेकवेळा त्या डॉक्टरांच्या वागण्या-बोलण्यातील फरक हा त्यांच्या स्पेशलायजेशननुसार वेगवेगळा असतो. डॉक्टरांमधील हे फरक सहज लक्षात येण्यासारखे आहेत. प्रत्येक डॉक्टरला हे लागू होईलच असे नाही; पण, बहुतांश डॉक्टरांची ही वैशिष्ट्ये तुम्ही टिपू शकाल. डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांच्या उपचारपद्धतीनुसार त्यांची वैशिष्ट्ये बदलतात, हे या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत.
स्त्रीरोग तज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) या नावातच त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांचे स्वरूप स्पष्ट होते. त्यांच्याकडे महिला रुग्ण आणि गर्भवती महिला या तपासणीसाठी येत असतात. त्यामुळे मातृत्व, वात्सल्याची भावना त्या डॉक्टरांच्या बोलण्यातून अधिक दिसून येते. या डॉक्टरांचे बोलणे हळूवार असते. महिलांशी योग्य पद्धतीने ते संवाद साधतात. महिलांशी संवाद साधत असल्यामुळे अन्य व्यक्तींशी संवाद साधतानाही ते त्याच पद्धतीने मृदू भाषेत बोलतात. लहान मुलांचे डॉक्टर (पिडियाट्रिक्स) हे सर्व डॉक्टरांपेक्षा वेगळे असतात. कारण, दरदिवशी हट्टी, शांत, खोडकर, सतत वळवळ करणाऱ्या, कोणाचेही न ऐकणाऱ्या अशा विविध मुलांशी त्यांना बोलायचे असते. त्यामुळे ते प्रेमळ आणि वेळेला कडक वागणारे असतात. समोर ज्या पद्धतीचे मूल असेल त्याप्रमाणेच ते स्वत:च्या बोलण्या-वागण्यात बदल करत असतात. लहान मुलांचे लाडके डॉक्टर होण्यासाठी ते अनेक कौशल्ये स्वत:मध्ये विकसित करत असतात. त्याचा परिणाम असा होतो की, अनेकदा मोठ्या व्यक्तींशी बोलतानाही त्यांच्या बोलण्यात लहान मुलांचा खोडकरपणा, मिश्किलपणा पाहायला मिळतो.
अस्थिव्यंग तज्ज्ञांचा (ऑर्थोपेडिक) रूबाबच वेगळा असतो. या डॉक्टरांच्या कामाचे स्वरूप हे थोडे राकट असे असते. कारण, हाड मजबूत तर शरीर मजबूत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हाड तुटल्यावर ते जोडणे, हाडांमध्ये काही दुखापत झाल्यावर हळूवार काम केले तर चालत नाही. त्यामुळे हे डॉक्टर रफ अँड टफ असतात. या डॉक्टरांशी बोलताना मृदूपणा दिसून येतच नाही. कारण, हळूवार बोलल्यास रुग्ण त्यांचे ऐकणारच नाही. त्यामुळेही या डॉक्टरांना असे बोलण्याची सवयच लागते. या डॉक्टरांना हाडाला जास्त इजा होऊ नये म्हणून कमी वेळात हाडे जागेवर बसवणे, जोडणे आवश्यक असते. त्यामुळे ऑर्थोपेडिक्स डॉक्टरांची निर्णयक्षमता अधिक आणि वेगवान असते. हे डॉक्टर तुमच्याशी प्रेमाने हळूवार बोलणार नाहीत. त्यांच्या चालण्या-बोलण्यातून, वावरण्यातून हा वेगळेपणा सहज टिपता येण्यासारखा आहे.
त्वचारोग तज्ज्ञांचा (डर्मटलॉजिस्ट) संबंध त्वचेशी म्हणजेच सौंदर्याशी आणि नाजूकपणाशी आहे. सौंदर्याशी या डॉक्टरांचा संबंध येत असल्यामुळे या डॉक्टरांचे राहणीमान नेहमीच टापटीप असते. अन्य डॉक्टरांपेक्षा कपड्यांबाबत, दिसण्याबाबत हे डॉक्टर अधिक काटेकोर असतात. हे डॉक्टर सहसा घाईत आणि पटापट बोलताना आढळत नाहीत. शांतपणे हळूवार बोलतात. रुग्ण समोर नसतानाही हे डॉक्टर अत्यंत हळूवार बोलतात. यांच्या चालण्या-बोलण्यातून मृदूता आढळून येते.
मानसोपचारतज्ज्ञ (सायक्रॅटिस्ट) हे नेहमीच शांत आणि आनंदी असतात. कोणत्याही परिस्थितीत हे पटकन रागवत नाहीत किंवा प्रतिक्रियाही देत नाहीत. मानसोपचारतज्ज्ञ ज्या रुग्णांवर उपचार करतात त्या रुग्णांना डॉक्टरांवर विश्वास बसणे महत्त्वाचे असते. त्यामुळे हे डॉक्टर विश्वास संपादन करण्यात माहिर असतात. समोर रुग्ण नसतानाही अन्य व्यक्तींशी संवाद साधताना ते शांतपणे सर्व गोष्टी ऐकून घेतात अथवा तसा अभिनय तरी करतात. हे डॉक्टर सर्व व्यक्तींशी त्यांच्या विशिष्ट शैलीत संवाद साधतात. एका व्यक्तीशी बोलतात त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधतील असे नाही.
जनरल मेडिसिनचे डॉक्टर बोलताना तर्कशुद्ध पद्धधतीने बोलतात. समाजात काम केले असल्यामुळे या डॉक्टरांचे संभाषण कौशल्य चांगले असते. संशोधनवृत्ती आणि तर्कशुद्धता यांच्या बोलण्यातून दिसून येते. अभ्यासपूर्ण गोष्टी बोलण्याकडे या डॉक्टरांचा भर असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.