‘हिंदी सक्ती रद्द’च्या निर्णयामुळे आनंद

‘हिंदी सक्ती रद्द’च्या निर्णयामुळे आनंद

Published on

74239

‘हिंदी सक्ती रद्द’च्या निर्णयामुळे आनंद

बांद्यात जल्लोष; मनसे, ठाकरे गटातर्फे आतषबाजी, मिठाई वाटप

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे व ठाकरे शिवसेनेने आनंद व्यक्त केला आहे. आज बांदा येथे उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात फटाके फोडून व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
राज्याने सुरुवातीला हिंदी ही सक्तीची भाषा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यात बदल करत राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. राज्यात त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे विरोध केला होता. यासंदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीराम चौकात यावेळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, रितेश नाटेकर, नागेश बांदेकर, राजदीप पावसकर, साईनाथ करमळकर, विशू पावसकर, अनिल नाटेकर, सुनील नाटेकर, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, प्रमोद कळंगुटकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत पांगम, विजय बांदेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com