दाभोसवाडा परिसरात अवतरले प्रतिपंढरपूर
74202
दाभोसवाडा परिसरात
अवतरले प्रतिपंढरपूर
वेंगुर्ले, ता. ३० ः दाभोसवाडा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात सुरू असलेल्या अखंड वीणा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २९) काढण्यात आलेल्या दिंडीने परिसरात प्रतिपंढरपूर अवतरले. दिंडीतील वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
दाभोसवाडा येथील विठ्ठल-रखुमाईचा अखंड वीणा सप्ताह २३ जूनपासून सुरू झाला. सप्ताह कालावधीत मंदिरात विविध भजन मंडळांची भजने, तसेच विठ्ठल-रखुमाईची आकर्षक पूजा, पौराणिक कथांवर देखावे असे कार्यक्रम सुरू होते. सप्ताहाच्या सातव्या दिवशी रविवारी सायंकाळी दाभोसवाडा तसेच विठ्ठलवाडी येथील वारकरी मंडळींनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या गजरात विठ्ठल मंदिरापर्यंत दिंड्या नेल्या. या दोन्ही दिड्यांमध्ये हौशी युवकांनी पौराणिक कथांवर आधारित वेशभूषा सादर केल्या. दिंडीच्या स्वागतासाठी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी व पताकांनी परिसर सुशोभित केला होता. वारकऱ्यांनी भजनासह विठुरायाच्या जयघोषात विविध नृत्यप्रकार सादर केले. दाभोसवाडा येथे अवतरलेले हे प्रतिपंढपूर ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.