शिक्षणमहर्षी एच.डी.गावकर होते पर्यावरणप्रेमी ः खोचरे

शिक्षणमहर्षी एच.डी.गावकर होते पर्यावरणप्रेमी ः खोचरे

Published on

74231

शिक्षणमहर्षी एच.डी.गावकर
होते पर्यावरणप्रेमी ः खोचरे

वायरी येथे जयंतीदिनी वृक्षारोपण

वायरीत
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामीण भागात ज्या शिक्षण महर्षीनी शिक्षण संस्थांची स्थापना केली, त्यात (कै.) एच. डी. गावकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गावकर हे जसे शिक्षणप्रेमी होते, तसेच ते पर्यावरणप्रेमीही होते. म्हणूनच दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांना जयंतीदिनी अभिवादन केले जाते. त्यांनी निसर्गावर प्रेम करा, असा संदेश दिल्याचे प्रतिपादन श्री रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी येथे केले.
मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक शिक्षण महर्षी (कै.) एच. डी. गावकर यांची १०६ वी जयंती प्रशाळेच्या आवारात वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक शिक्षक नंदकिशोर डगरे यांनी (कै.) गावकर यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. समाज जडणघडणीसाठी त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. श्रीनाथ फणसेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण कुबल यांनी आभार मानले. यावेळी प्रशालेचे शिक्षक शुभदा शिंदोळकर, संभाजी कोरे, रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर, यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com